Omprakash Divate PMC | जनगणना 2027 च्या घरयादी कामाला वेग नाही; मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिला कडक इशारा

Homeadministrative

Omprakash Divate PMC | जनगणना 2027 च्या घरयादी कामाला वेग नाही; मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिला कडक इशारा

Ganesh Kumar Mule May 23, 2026 8:36 PM

Pune PMC Budget 2025-26 | पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंत्रालयात तयार करावा 
FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!
PMC Heritage Yatra 2025 | आजपासून “हेरिटेज यात्रा २०२५” सांस्कृतिक वारसा उत्सव | पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

Omprakash Divate PMC | जनगणना 2027 च्या घरयादी कामाला वेग नाही; मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिला कडक इशारा

Pune News – (The Karbhari News Service) – जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याच्या कामाची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असल्याने पुणे महानगरपालिकेने आज तातडीची आढावा बैठक घेतली. श्री गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट येथे झालेल्या या बैठकीला याकामी नियुक्त 1600 पर्यवेक्षक उपस्थित होते. (Pune Breaking News)

11000 प्रगणक, पण काम संथगतीने

शहरात सध्या सुमारे 11 हजार प्रगणकांमार्फत घरोघरी जाऊन घरयादीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष घरभेटी आणि माहिती संकलनाची प्रगती समाधानकारक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यावर चर्चा करण्यासाठी पर्यवेक्षकांची बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीत कामात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून सुधारणांसाठी सूचना देण्यात आल्या. तांत्रिक बाबी, मोबाईल ॲपची माहिती याबाबत पुन्हा उजळणी करण्यात आली. चार्ज ऑफिसर्स आणि पर्यवेक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रगणकांच्या कामावर दररोज देखरेख ठेवण्याचे आणि घरभेटी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

अतिरिक्त आयुक्तांचा कडक इशारा

बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि जनगणना संचलनालयाचे सहसंचालक राजेश भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी पर्यवेक्षकांना तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
दिवटे यांनी अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या प्रगणकांनी आणि पर्यवेक्षकांनी मनपाकडून ‘जनगणना किट’ ताब्यात घेतले आहेत, पण अद्याप काम सुरू केलेले नाही किंवा जे प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिले आहेत, अशा सर्वांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
“अशा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर्तव्यावर हजर होऊन काम सुरू करावे. अन्यथा त्यांच्यावर जनगणना कायदा 1948 मधील तरतुदींनुसार कडक शिस्तभंगविषयक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पुणेकर नागरिकांना आवाहन केले आहे. “घरी भेट देणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन जनगणनेच्या या राष्ट्रीय कामात सर्व पुणेकरांनी सहकार्य करावे.”
जनगणनेचे काम विहित कालमर्यादेत व अचूकतेने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

जनगणना 2027 चा पहिला टप्पा म्हणजे घरयादी तयार करणे. यामध्ये प्रत्येक घराची रचना, सुविधा, कुटुंबातील सदस्यांची माहिती संकलित केली जाते. हे काम अचूक झाले तरच दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणना योग्य पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने आता देखरेख अधिक कडक केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: