Pune Property Tax | ३१ मे पूर्वी मिळकतकर भरा आणि ५ ते १०% सवलत मिळवा  | मिळकतकर विभागाचे पुणेकरांना आवाहन

Homeadministrative

Pune Property Tax | ३१ मे पूर्वी मिळकतकर भरा आणि ५ ते १०% सवलत मिळवा | मिळकतकर विभागाचे पुणेकरांना आवाहन

Ganesh Kumar Mule Apr 28, 2026 7:47 PM

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | Court relief to candidates who do not want to appear in the examination
NCP Pune | समाविष्ट ३४ गावांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी द्यावा | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
DCM Ajit Pawar PMU Meeting | विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी

Pune Property Tax | ३१ मे पूर्वी मिळकतकर भरा आणि ५ ते १०% सवलत मिळवा

| मिळकतकर विभागाचे पुणेकरांना आवाहन

 

PMC Property Tax – The karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कर आकरणी व करसंकलन विभागामार्फत २०२६-२७ ची मिळकतकर देयके तयार करण्यात आली आहेत. पोस्ट विभागामार्फत त्याचे वितरण करण्यात येत आहे. कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मिळकत कराच्या सर्वसाधारण करामध्ये ५ ते १०% सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. ही सवलत ३१ मे २०२६ पर्यंत लागू राहणार असून, जे नागरिक आपला संपूर्ण मिळकतकर विहित मुदतीत भरतील त्यांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. असे आवाहन मिळकत कर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी केले आहे. (PMC Property tax Department)

नागरिकांच्या सोयीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय., कॉसमॉस बँकेत देखील आपला मिळकतकर भरता येणार आहे. पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र) सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत सुरु राहणार आहेत.

नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही याकरिता जास्तीत जास्त मिळकत धारकांनी ऑनलाईन पध्द्तीने propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर आपला मिळकतकर भरावा. तसेच ज्या मिळकत धारकांना अद्याप मिळकतकराचे देयक पोस्ट विभागामार्फत प्राप्त झाले नाही. त्यांनी याच संकेतस्थळा वरील TAX BILL या पर्यायावर क्लिक करून आपला मिळकत क्र. नोंदविल्यास देयक प्रत Download करून घेता येईल याची नोंद घ्यावी. असे पवार यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: