PMC HOD Present for GB | मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेस खातेप्रमुख यांची अनुपस्थिती | महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी 

Homeadministrative

PMC HOD Present for GB | मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेस खातेप्रमुख यांची अनुपस्थिती | महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी 

Ganesh Kumar Mule Apr 18, 2026 7:35 AM

Traffic changes | १ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल
Balkadu Cartoon Exhibition | MLA Ravindra Dhangekar | बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे | आमदार रवींद्र धंगेकर
Sharad Pawar | Kasba | कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार

PMC HOD Present for GB | मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेस खातेप्रमुख यांची अनुपस्थिती | महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

Naval Kishore Ram IAS -(The Karbhari News Service) – महापालिका मुख्य सभेस व इतर समितीच्या सभेस संबंधित खातेप्रमुख सभागृहात उपस्थित राहत नाहीत. यावरून काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. यावरुन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील खातेप्रमुख यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेस सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी बैठकीस संपुर्ण वेळ उपस्थित राहणे बंधनकारक राहील, असे आदेश आयुक्तांनी जरी केले आहेत. (PMC General Body Meeting)

आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, खातेप्रमुख उपस्थित नसल्याने सभासद यांना पुणे शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक/चर्चा करता येत नसल्याने वेळेचा अपव्यय होत असल्याने याबाबत सभासदांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानुषंगाने मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेस सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी बैठकीस संपुर्ण वेळ उपस्थित राहणे बंधनकारक राहील. काही अपरिहार्य कारणास्तव एखादे बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना विषयाशी संबंधित माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत. सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख  सूचनांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. असे सक्त आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: