PMC JE Recruitment 2026 Exam Date | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | परीक्षा केंद्र आणि वेळ लवकरच कळवणार 

Homeadministrative

PMC JE Recruitment 2026 Exam Date | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | परीक्षा केंद्र आणि वेळ लवकरच कळवणार 

Ganesh Kumar Mule Apr 15, 2026 6:31 PM

Bhide Wada | भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती
Pune PMC News | ईगल व सिंग सिक्युरिटी कंपनी  कडून दोन महिन्यापासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे पगार प्रलंबित | महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे ठिय्या आंदोलन
PMC Medical Officer Transfer | आरोग्य प्रमुखांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या! 

PMC JE Recruitment 2026 Exam Date| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | परीक्षा केंद्र आणि वेळ लवकरच कळवणार

 

PMC Junior Recruitment Bharti Exam – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पहिल्यांदा यासाठी १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याची तारीख प्रशासना कडून २५ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा २२ ते २९  एप्रिल च्या दरम्यान होणार आहे. एकूण ३  दिवस म्हणजे २२, २३ आणि २९ एप्रिल अशी परीक्षा चालणार आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले आहे.  (Pune PMC News)

प्रशासनाकडून सूचना देण्यात आली आहे कि, परीक्षेकरिता संबंधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्र व वेळ अलाहिदा कळविण्यात येईल. उमेदवारांना परीक्षा दिनांकाच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS / Email द्वारे युजरआयडी व पासवर्ड पाठविण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट  https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment आणि  https://www.pmc.gov.in/en/b/recruitment या लिंक वरून उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे.

हेल्पलाईन क्रमांक – १८००२२३६६ /१८००१०३४५६६

हेल्पलाईन लिंक – http://cgrs.ibps.in 

 

परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद केलेप्रमाणेच असेल.

 

The Karbhari च्या बातमीवर शिक्कामोर्तब : PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!

 

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2026)

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरु केली होती. १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: