PMC Ward Officer | आपत्कालीन परिस्थितीत  महापालिका सहाय्यक आयुक्त यांना इंसीडंट कमांडंट म्हणून पाहावे लागणार काम! 

Homeadministrative

PMC Ward Officer | आपत्कालीन परिस्थितीत  महापालिका सहाय्यक आयुक्त यांना इंसीडंट कमांडंट म्हणून पाहावे लागणार काम! 

Ganesh Kumar Mule Apr 14, 2026 3:50 PM

PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी 
Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना पुस्तकांच्या खरेदीवर १०० रुपये सवलत|  सोसायटीमध्ये वाचनालयासाठी १००० रुपयांची सवलत
Cleanliness campaign | पुणे शहरातील स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सक्रिय सहभाग

PMC Ward Officer | आपत्कालीन परिस्थितीत  महापालिका सहाय्यक आयुक्त यांना इंसीडंट कमांडंट म्हणून पाहावे लागणार काम!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी इंसीडंट कमांडंट (Incident Commandant) म्हणून कामकाज पाहायचे आहे. याबाबतचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत. (PMC Assistant Commissioner)

आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्घटनेच्या ठिकाणी शोध, बचाव कार्य व मदत देण्याचे काम पुणे महानगरपालिकेकडून केले जाते. त्या नुसार पुणे महानगरपालिकेकडील निर्देशित अधिकारी यांनी घटनास्थळी त्वरित पोहोचून घटनास्थळाचे नियंत्रण पूर्णपणे स्वतःकडे घेऊन घटनेची तीव्रता आणि प्रकार यानुसार पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांसमवेत व आवश्यकतेनुसार इतर शासकीय विभागांसमवेत संपर्क व समन्वय साधून प्रतिसाद यंत्रणा तात्काळ दुर्घटनेच्या स्थळी उपलब्ध होतील यांची तजवीज करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये संबंधित घटना घडलेल्या क्षेत्रातील महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी इंसीडंट कमांडंट ( Incident Commandant) म्हणून  कामकाज करावयाचे आहे.

असे असणार काम

१. पूर्वतयारी :-
आपल्या कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रसंगी आवश्यक साधनसामग्री, छोटे पंप, जेटिंग मशीन, बोट/रबर बोट, जनरेटर, निवाराकेंद्र इत्यादी बाबी वेळोवेळी तपासणी करून सुस्थितीत असलेबाबत (Operational Status) निश्चिती करणे. सर्व उपकरणांचे प्रत्यक्ष ट्रायल रन (Mock Drill/Testing) घेऊन ते आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वापरण्यास सज्ज आहेत याची खात्री करावी. तसेच आपले कार्यक्षेत्रातील विविध विभागांचे/सामाजिक संस्थांचे/ मंडळांचे संपर्क क्र. अद्ययावत ठेवणे. ‘

२. नियंत्रण व नियोजन: :
घटनास्थळाचे नियंत्रण हाती घेणे आणि आपत्ती प्रतिसाद प्रणाली (Incident Response System) कार्यान्वित करणे. बचाव कार्यासाठी घटनेच्या स्वरूप व तीव्रतेनुसार कृती आरखडा (Incident Action Plan) आखणे. नियोजन करताना मुख्य उद्देश जीवितहानी टाळणे व वित्तहानी कमी करणे आणि परिस्थिती पूर्ववत करणे हा ठेवावा. बचाव कार्य राबविणेकरिता संबंधित विभागांसमवेत समन्वय साधून अग्निशमन दल, वैद्यकीय मदत (Ambulance), क्षेत्रिय अथवा मुख्य खात्याकडील कर्मचारी, आवश्यक असणारी वाहने आणि पोलीस कर्मचारी यांची आवश्यकता निश्चित करून त्यांना तैनात करणेबाबत कार्यवाही करावी. तसेच आवश्यकतेनुसार इतर विभागांसमवेत संपर्क करून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी. त्याकरिता सर्व मुख्य खात्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वय साधनेकरिता आपल्या खात्याचे जबाबदार नोडल अधिकारी यांचे आदेश निर्गमित करून आपत्ती व्यवस्थापन विभागास सादर करणे.

३. सुरक्षितता सुनिश्चित करणे :
घटनास्थळी सर्वसामान्यांची सुरक्षेकरिता धोकादायक क्षेत्र पोलीस विभागाचे समन्वयाने रिकामे करण्याची कार्यवाही करणे. दुर्घटनेमध्ये बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करावयाचे असल्यास त्यानुसार पीएमपीएमएल व मोटार वाहन विभाग यांचेसमवेत समन्वय साधून आवश्यक वाहनांची वाहन व्यवस्था उपलब्ध करून स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी. निश्चित करण्यात आलेली निवारा केंद्रांच्या ठिकाणी जेवण, पाणी, विद्युत, निवारा ( गाद्या, चादर इ.), स्वच्छतागृह व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करणे.

४. अतिरिक्त मदत :
घटनेच्या वेळी संबधित क्षेत्रातील महापालिका सहाय्यक आयुक्त तथा इंसीडंट कमांडंट ( Incident Commandant) यांचे मागणी नुसार मदतीसाठी बांधकाम विभाग, भवन रचना विभाग, मलनि:सारण विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, पथ विभाग, आरोग्य विभाग, सुरक्षा विभाग, घन कचरा व्यवस्थापन विभाग, मोटार वाहन विभाग, पी. एम. पी. एम. एल. इत्यादी खात्यांनी प्राधान्याने आवश्यक मदत करणे.

५ . संवाद आणि समन्वय :
घडलेल्या घटनेची माहिती व सुरु असलेल्या प्रतिसाद व बचावकार्याची माहिती त्वरित आपत्ती व्यवस्थापन कक्षास देणेत यावी. शोध व बचाव कार्य पूर्ण झालेनंतर नुकसान झाले असल्यास त्या ठिकाणाचा पंचनामा तहसीलदार व पोलीस विभागाकडून पूर्ण करून घटनेचा सविस्तर अहवाल सादर करणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: