Pune Breaking News | वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक

Homeadministrative

Pune Breaking News | वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक

Ganesh Kumar Mule Apr 13, 2026 8:47 PM

Pune Traffic | मुख्यमंत्रीसाहेब पुण्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मिळण्यासाठी मुहूर्त कधी लागणार? – माजी आमदार मोहन जोशी
Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 5 एप्रिलला कामगार युनियनचा मोर्चा
Rahul Gandhi | लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर | मोहन जोशी राहिले जामीनदार  

Pune Breaking News | वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक!

| शहर परिवर्तन कक्षाची  दुसरी बैठक

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरा समोरील वाढती विविध स्वरूपाची शहरी आव्हाने प्रभावीपणे हाताळण्या साठी तसेच विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी “शहर परिवर्तन समिती” स्थापन करण्यात आली आहे. पुणे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुरळीत करणेच् असे प्रश्न, शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढविणे, रस्ते चांगले करणे, शहर स्वच्छ आणि सुंदर करणे यावर उपाय योजने बाबत शहर परिवर्तन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याची दुसरी बैठक आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली. (Pune City Transformation)

बैठकीमध्ये यापूर्वी  झालेल्या शहर परिवर्तन कक्षाचे बैठकीचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला. पुणे शहरातील १२ मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसन बाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली असून यामध्ये बाणेर – पाषाण लिंक रोड, वाकड ते कस्पटे वस्ती रोड, आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज रस्ता व वारजे येथील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर येथील मिसिंग लिंक वर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली यामधील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणाऱ्या बाबी जसे कि, मोजणी ,अतिक्रमण काढण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली असून जि-ल्हाधिकारी यांनी संबंधित शासकीय विभागाला वेळेत काम पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहेत.

३२ रस्त्यांच्या फुटपाथवर अडथला ठरणारे फीडर पिलरचे सादरीकरण करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी MSEDCL च्या मुख्य अभियंता यांनी सदर फीडर पीलर चे डिझाईन Approve करून तातडीने शिफ्ट करण्याचे आदेशित करण्यात आले आहेत. तसेच पुणे शहरांमधील प्रमुख ३२रस्त्यांचे “MISSION ३२”चे अंतर्गत सदरील कामे युद्ध पातळीवर करणे बाबत महापालिका आयुक्त यांनी पुणे मनपाच्या पथ, प्रकल्प, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागास आदेश दिले. पुणे महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आर.पी. रस्त्यानुसार प्रत्येक गावनिहाय एक रस्ता याप्रमाणे ३२ गावांमधील पोलीस विभागांच्या समन्वयाने निश्चितीनुसार ३२ प्रमुख रस्त्याच्या विकसनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना मा. महापालिका आयुक्त यांनी आजच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत.

रस्त्यांमधील जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने मा. जिल्हाधिकारी यांचे मंजुरीसाठी सादर करणेबाबत सूचित केले व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्त्यांसाठी ताब्यात आलेल्या जागांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांचे सोयीसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार करण्यात आले असून नागरिकांनी त्यांचे रस्त्या संबंधित तक्रारी साठी सदर ॲप्लिकेशन्सचा वापर करून तक्रार निवारण करणे बाबत आदेश दिले आहेत. तसेच पोलीस विभागामार्फत तयार करण्यात आलेले PTP (Pune city Traffic Police) हे ॲप्लिकेशन्स पुणे महानगरपालिकेच्या ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स ला लिंक झाल्यास एकत्रितपणे रस्ते व वाहतुक सुरळीत होणार याबाबत चर्चा झाली.

पोलीस उपायुक्त वाहतूक यांनी रस्ते खोदाईबाबत NOC तात्काळ देण्यात येईल असे सूचित करून परिपूर्ण माहिती असणारे अधिकारी यांनी त्यासाठी संपर्क केल्यास निर्णय घेणे सोयीचे होईल. असे सूचित केले.

पुणे मनपामार्फत विविध रस्त्यांवर पावसाळ्यामुळे वॉटर लॉगिंग चे ठिकाणे निश्चित करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक परिमंडळ निहाय वॉटर लॉगिंग एरिया करिता टेंडर प्रकिया पूर्ण करून काम करून सुरू करणे येत आहे.

भूसंपादन करतेवेळी वनविभागामुळे अडथळा ठरणाऱ्या ठिकाणाबाबत चर्चा करण्यात आली असून वन विभागाच्या संबंधित अधिकारी यांचेकडे पुणे महानगरपालिके मार्फत सादर करण्यात आलेल्या वन विभागाचे ताब्यातील जागांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणेबाबत सूचित केले.

जिल्हाधिकारी यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक पोलीस यांना MISSION ३२ अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यावरील रिक्षा थांबा ठिकाणे प्रत्यक्ष जागेवर मार्किंग करून निश्चित करणे व बेवारस वाहने उचलणे याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पुणे शहरातील महत्त्वाचे ५ रस्त्यांवर पे & पार्क बाबत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

पाणीपुरवठा विभागाकडील पाण्याच्या टाक्या उभारण्या साठी आवश्यक असलेल्या सरकारी जागांचे मोजणी व भूसंपादनाचे अनुषंगाने सदरचे प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे बाबत आदेश दिले असून यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीमध्ये स्पष्ट केले.

वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करून त्यांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर सर्व संबधित विभागांशी समन्वय ठेवून कामाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी देवून पुढील बैठकीपूर्वी सर्व मुद्द्यांवर अनुपालन सादर करण्याचे आदेश दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: