PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!  

Homeadministrative

PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!  

Ganesh Kumar Mule Apr 04, 2026 6:29 PM

Jilha Parishad Bharti 2023 | राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती; जाहिरात उद्या
PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात
PMC Junior Engineer Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीसाठी महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा!

PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!

 

PMC Junior Recruitment Bharti Exam – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पहिल्यांदा यासाठी १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याची तारीख प्रशासना कडून २५ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार आहे. एकूण ४ दिवस परीक्षा चालणार आहे.  महापालिका प्रशासनाकडून याची घोषणा केलेली नाही. मात्र याबाबतचे निवेदन सामान्य प्रशासन विभागाने महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवले आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. (Pune PMC News)

राज्यातील विविध शहरात ही परीक्षा होणार आहे.  या आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रा बाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार हि परीक्षा २५ जानेवारी ला आयोजित करण्यात आली होती. त्याची सर्व तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासना कडून सांगण्यात आले होते कि, अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

दरम्यान आता ही परीक्षा २२ ते २७ एप्रिल अशी चार दिवस चालणार आहे. IBPS संस्थेकडून याबाबत महापालिका प्रशासनाला तारखा कळवण्यात आल्या आहेत. त्यानुसार  २२, २३, २४ आणि २७ एप्रिल अशी चार दिवस परीक्षा घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून महापालिका आयुक्त यांच्यासमोर निवेदन ठेवले आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर याची माहिती उमेदवारांना दिली जाणार आहे.

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2026)

 

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरु केली होती. १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: