Pune PMC News | पुणे महानगरपालिकेचे व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरु करण्याची नगरसेवकांची मागणी 

HomeBreaking News

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेचे व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरु करण्याची नगरसेवकांची मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 01, 2026 11:46 AM

Chandrakant Patil | विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वाचनालये सुरू व्हावीत | ना.चंद्रकात पाटील यांचे आवाहन | देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या अभ्यासिकेचे उदघाटन
PRAN- PAN CARD | PRAN कार्ड आणि PAN कार्डमध्ये काय फरक आहे | हे कार्ड देशातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे 
Pune Heritage Walk | पुणे शहरात विविध ठिकाणांचे “हेरीटेज वॉक” सुरु केले जाणार  | १०० पासून ते ५०० पर्यंत असणार तिकीट 

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेचे व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरु करण्याची नगरसेवकांची मागणी

| प्रस्तावाचा चेंडू प्रशासनाच्या कोर्टात

 

PMC Women and Child Welfare Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे (PMC)  व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरु करण्यात यावे व यासाठी सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात यावी.  अशी मागणी भाजप नगरसेविका  वृषाली आनंद रिठे (Vrushali Rithe BJP)  व  प्रसन्न घनश्याम जगताप (Prasanna Jagtap BJP) यांनी केली आहे. याबाबत या दोघांनी महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान हा प्रस्ताव आता प्रशासनाच्या अभिप्राया साठी पाठवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

रिठे आणि जगताप यांच्या प्रस्तावानुसार  पुणे शहरामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे मद्य, तंबाखू, अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंब आर्थिक, सामाजिक व मानसिक अडचणीत सापडत असून युवकवार्गावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. तसेच गुन्हेगारी, कौटुंबिक कलह, आरोग्य समस्या आणि सामाजिक असुरक्षितता यामध्ये व्यसनाधीनतेमुळे वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि,  पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी व्यापक, सुसज्य आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेचे सुसज्य व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरु करणे काळाची गरज आहे. या केंद्रांमार्फत उपचार, समुपदेशन, जनजागृती मोहीम तसेच कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देता येईल. या केंद्रामध्ये वैद्यकीय उपचार, मानसोपचार, समुपदेशन तसेच जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत. त्यामुळे  पुणे महानगरपालिकेचे व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरु करण्यात यावे व यासाठी सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात यावी.

दरम्यान समिती ने हा प्रस्ताव प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठवला आहे. अभिप्राय आल्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: