PMC Rani Laxmibai Scheme | राणी लक्ष्मीबाई योजनेला मुदतवाढ | एप्रिल महिन्यात देखील राबवू शकणार योजना    | स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Homeadministrative

PMC Rani Laxmibai Scheme | राणी लक्ष्मीबाई योजनेला मुदतवाढ | एप्रिल महिन्यात देखील राबवू शकणार योजना  | स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Mar 28, 2026 8:23 PM

PMC Security Department | शिक्षण विभागातील ४८५ सुरक्षा रखवालदारांचे सुरक्षा विभागात होणार समायोजन | तत्काळ केल्या जाणार बदल्या | अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश 
Transfer | PMC Pune employees | बदली झाली तरी मूळ खाते सोडू वाटेना! | अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश
Maharashtra Diwas | महाराष्ट्र दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? 

PMC Rani Laxmibai Scheme | राणी लक्ष्मीबाई योजनेला मुदतवाढ | एप्रिल महिन्यात देखील राबवू शकणार योजना

| स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले यांची माहिती

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण, आरोग्य, स्वावलंबन व सामाजिक सुरक्षितता बळकट करण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना राबवली जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना समान निधी देऊन सर्व कार्यालयांमध्ये ही योजना राबवली.  आठ ते १४ मार्च या कालावधीत या योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिलांच्या सक्षमीकरण व उन्नतीसाठी प्रत्येक प्रभागनिहाय विविध उपक्रम राबवले जाणार होती. त्यानुसार काही ठिकाणी योजना राबवण्यात आली.  मात्र काही क्षेत्रीय कार्यालयांना ही  योजना राबवता आली नाही, त्यामुळे आता योजना एप्रिल महिन्यात देखील राबवता येईल. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.  (Shirnath Bhimale PMC)

याअंतर्गत कौशल्य विकासासाठी तीन ते पंधरा दिवसांचे ब्युटी पार्लर, इंटरनेट व लघुउद्योग मार्गदर्शन, विक्री प्रशिक्षण, शिवण मशीन ऑपरेटर, डेटा एंट्री, ऑफिस असिस्टंट, रिसेप्शनिस्ट आदी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजिण्यात येतील. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगार व उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी प्रशासनामार्फत सादर झालेल्या तीन कोटी ३४ लाख ६८ हजार रुपयांच्या निविदांना मान्यता देण्यात आली होती. ‘या योजनेमध्ये महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिक महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी विशेष प्रकल्पांचा समावेश असेल. पालिकेचा सुरक्षा विभाग व पोलिसांच्या समन्वयातून प्रत्येक प्रभाग स्तरावर प्रशिक्षण व जनजागृती शिबिरे आयोजित केली जातील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत मुलींच्या जन्मदरवाढीपासून शिक्षण, आरोग्य व बालविवाह प्रतिबंध याबाबत जनजागृती कार्यक्रम हाती घेतले जातील,.

या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणीचाही समावेश असून यात स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग आदी आजारांबाबत तपासणी व मार्गदर्शन केले जाईल. इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने ही शिबिरे आयोजित केली जातील. बचत गट, कचरा वेचक महिला, स्वच्छता कामगार महिला, स्वयंसेवी संस्था आदी घटकांपर्यंत हे उपक्रम पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी व्याख्याने, कार्यशाळा तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र घेण्यात येतील. आरोग्य, पोषण, पर्यावरण, संगणक साक्षरता, सामाजिक शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन अशा विविध विषयही यात अंतर्भूत असतील.

आधीच्या प्रस्तावानुसार ही योजना ११ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येणार होती. मात्र,ही योजना सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबवावी, अशी उपसूचना सर्व सदस्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या समितीत एकमताने केली होती. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना समान निधी देऊन सर्व ठिकाणी ही योजना राबवली जाईल. तसेच या उपक्रमांव्यतिरिक्त नगरसेवक काही अतिरिक्त नवे उपक्रमही सुचवतील. आठ ते १४ मार्च दरम्यान जेवढे उपक्रम राबवले जातील, त्याचेच पैसे अदा केले जातील. असे ठरवण्यात आले होते. मात्र काही क्षेत्रीय कार्यालय ही योजना सुरु करू शकले नाहीत. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून एप्रिल महिन्यात देखील ही योजना राबवता येईल. अशी माहिती भिमाले यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: