Shrinath Bhimale PMC | वॉलमनची मक्तेदारी आता संपणार | नेमणूक करताना सर्टिफिकेट बंधनकारक  | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | वॉलमनची मक्तेदारी आता संपणार | नेमणूक करताना सर्टिफिकेट बंधनकारक  | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Mar 27, 2026 9:35 PM

Pune PMC News | छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा तुषार पाटील यांचा आरोप  | मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच टेंडर लावल्याचा उपायुक्त यांचा खुलासा 
PMC Additional Commissioner | महापालिका अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त पदावर निवड करण्याच्या पात्रता निकषात बदल!
PMC Kamla Nehru Hospital | पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात २४ तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची भरती केली जाणार | महापालिकेकडून जाहिरात जारी

Shrinath Bhimale PMC | वॉलमनची मक्तेदारी आता संपणार | नेमणूक करताना सर्टिफिकेट बंधनकारक  | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – वर्षानुवर्षे पुणे शहरात चालत आलेली वॉलमनची मक्तेदारी आता संपणार आहे. वॉलमनची नेमणूक करताना त्यांना ट्रेनिंग सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात येणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.  (PMC Standing Committee)

स्थायी समितीच्या बैठकीत आज अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या  पाणीपुरवठा वर चर्चा झाली. यावेळी वॉलमनच्या मनमानी कारभारावर टीका करण्यात आली. वॉलमन हे विविध सोसायट्या कडून पाणी भरपूर प्रमाणात सोडण्यासाठी  पैसे घेतात, अशी तक्रार या अगोदर देखील करण्यात आली होती.

आगामी काळात ही मनमानी सहन केली जाणार नाही. असे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले. भिमाले म्हणाले, वॉलमनच्या वेतनावर महापलिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करत असते. हे लोक काही शहरातील काही परराज्यातील देखील असतात. एकत्रित टेंडर काढून यांची नेमणूक केली जाते. मात्र आगामी काळात आता एकाच ठेकेदाराला काम दिले जाणार नाही. हे टेंडर विभागून दिले जाणार. तसेच वॉलमनची नेमणूक करताना त्यांना ट्रेनिंग सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात येणार आहे. असे भिमाले यांनी सांगितले.

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0