PMC Standing Committee | खराडीतील जळीतग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत | प्रत्येकी ११ हजार रुपये नुकसानभरपाईला स्थायीची मान्यता

Homeadministrative

PMC Standing Committee | खराडीतील जळीतग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत | प्रत्येकी ११ हजार रुपये नुकसानभरपाईला स्थायीची मान्यता

Ganesh Kumar Mule Mar 13, 2026 7:00 PM

DCM Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न | एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता
Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर
Credit Score | Loan | तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो? |  तो महत्त्वाचा का आहे?  | जर तुम्ही कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर या गोष्टी नक्की जाणून घ्या

PMC Standing Committee | खराडीतील जळीतग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत | प्रत्येकी ११ हजार रुपये नुकसानभरपाईला स्थायी समिती ची मान्यता

| स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – खराडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील ९० झोपड्या २३ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाल्या होत्या. तसेच यात एका रहिवाशाचे निधनही झाले होते. यातील बाधित ९० कुटुंबांना प्रत्येकी ११ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यास  स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिली. (Shrinath Bhimale PMC)

या आगीतील बाधित व्यक्तींना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसाह्य मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मृत व्यक्तीच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून मदत देण्यात आली आहे. हवेलीच्या तहसीलदारांच्या अहवालानुसार बाधितांच्या झोपड्या पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या.  या आगीतील नुकसानग्रस्तांना भरपााई देण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री सचिवालयाने पालिकेला पत्रान्वये केल्या होत्या.

पालिकेच्या  हद्दीत पूर्वी लोहियानगर-गंजपेठ व पाटील इस्टेट-शिवाजीनगर येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेत पालिकेने बाधित कुटुंबीयांना प्रत्येकी ११ हजार रुपयांप्रमाणे अर्थसाह्य करण्यास पालिकेच्या मुख्य सभा व स्थायी समितीने ठरावांद्वारे मान्यता दिली होती.

याआधारे खराडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील जळीतग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. बाधित ९० कुटुंबांना प्रत्येकी ११ हजार प्रमाणे ९ लाख ९० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता.

महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्ती प्र्संगी आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. त्यातून या जळीतग्रस्तांना ९ लाख ९० हजार रुपयांची मदत देण्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी  समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. ही रक्कम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने दिली जाईल, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.

——————

मॅरेथॉनपटूंना बक्षीसासाठी निधी

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता  दिली आहे. या निधीसाठी महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात ३५  लाख रुपयांची  तरतूद आहे. सात डिसेंबर २०२५ रोजी ही ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पार पडली होती. यासाठी निधी देण्याची विनंती पुणे  आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन  समितीच्या विश्वस्तांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: