PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव प्रशासनाने घेतले मागे | प्रशासन बॅकफूटवर तर होर्डिंग धारकांना दिलासा 

Homeadministrative

PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव प्रशासनाने घेतले मागे | प्रशासन बॅकफूटवर तर होर्डिंग धारकांना दिलासा 

Ganesh Kumar Mule Feb 16, 2026 7:47 PM

Dr. Milind Kamble | डॉ. मिलिंद कांबळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार
Medha Patkar | अब्जाधीशांना मोठे केले जाते – मेधा पाटकर यांचे प्रतिपादन
BodyBuilding Competetion | जिल्हास्तरीय 16वी अरण्येश्वर पुणे श्री स्पर्धेचे निकाल घोषित 

PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव प्रशासनाने घेतले मागे | प्रशासन बॅकफूटवर तर होर्डिंग धारकांना दिलासा!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकाचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर ठरवण्यात आले आहेत. याबाबतचे दोन प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मुख्य सभे समोर ठेवले होते. आचारसंहिता लागू होण्या अगोदर या प्रस्तावांना स्थायी समिती ने मान्यता दिली होती. मात्र मुख्य सभेची मान्यता मिळू शकली नव्हती.  प्रशासकांनी या प्रस्तावांचा चेंडू नवीन नगरसेवकांच्या कोर्टात टाकला आहे. मात्र या प्रस्तावांना होत असलेला विरोध पाहून प्रशासनाने मुख्य सभेसमोर ठेवलेले हे दोन्ही प्रस्ताव मागे घेतले आहेत.  मात्र यामुळे प्रशासन बॅकफूटवर आले असून  शहरातील होर्डिंग धारकांना दिलासा मिळाला आहे, असे मानले जात आहे. (Pune Municipal Corporation -PMC)

 

| हे आहेत मागे घेतलेले प्रस्ताव

 

| जाहिरात फलक साठी 2023 ते 26 साठी 580 तर 2026 ते 29 सालापर्यंत 700 रु दर

पुणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकाचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर ठरवण्यात आले आहेत. आता हे दर २२२ रुपये प्रति चौरस फुटावरून ५८० ते ७०० इतका असणार आहे. पहिला प्रस्ताव हा जाहिरात फलकासाठी वर्ष २०२३ ते २०२६ साठी ५८० रु इतका दर असणार हा होता. तर दुसरा प्रस्ताव २०२६ ते २०२९ सालासाठी ७०० रु असा दर असणार हा होता. हे दोन्ही प्रस्ताव मागे घेण्यात आले आहेत.

| का मागे घेण्यात आले प्रस्ताव?

हे दोन्ही प्रस्ताव का मागे घेतले याबाबत स्पष्टीकरण देताना प्रशासनाने म्हटल आहे कि, या विषय पत्रात काही बाबींमध्ये तांत्रिक व प्रशासकीय स्वरूपाच्या दुरुस्त्या करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे. विषय पत्रात आवश्यक त्या दुरुस्त्या करून नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे विषयपत्र मागे घेण्याची आवश्यकता आहे. विषयपत्र दुरुस्त करून नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येईल. असे प्रशासनाने म्हटले आहे.

खालील प्रस्ताव मात्र तसाच ठेवला आहे. यावर १८ तारखेच्या सभेत चर्चा होईल. 

| अनधिकृत फ्लेक्स साठी आता १० हजार दंड तर फलक निष्कासन शुल्क २ लाख | जाहिरातदार तसेच जागा मालका वर देखील कारवाई

पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक जांगावर अनधिकृतपणे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, इ. वर क्षेत्रिय कार्यालयामार्फत दैनंदिन स्वरूपात निष्कासन कारवाई करण्यात येते. महापालिका प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बोर्ड, फ्लेक्स साठी १ हजार दंड घेतला जातो. तर अनधिकृत जाहिरात फलक निष्काचीत करण्यासाठी ५० हजार शुल्क घेतले जाते. मात्र आता या दंडात आणि शुल्कात वाढ करण्यात आली आहे. अनधिकृत फ्लेक्स साठी आता १० हजार दंड आणि निष्काचन शुल्क हे २ लाख इतके वाढवण्यात आले आहे.

हा प्रस्ताव मात्र प्रशासना कडून मागे घेण्यात आला नाही. हा तसाच ठेवण्यात आला आहे. यावर १८ तारखेच्या सभेत चर्चा होईल.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: