Pune Metro Stations | पुणे मेट्रो प्रवाशांसाठी पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकाची नवीन प्रवेशद्वारे उद्यापासून खुली

Homeadministrative

Pune Metro Stations | पुणे मेट्रो प्रवाशांसाठी पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकाची नवीन प्रवेशद्वारे उद्यापासून खुली

Ganesh Kumar Mule Feb 13, 2026 9:07 PM

PMC Cultural Centre Department | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महापालिकेकडून  पालखी मिरवणूक सोहळा
Honeytrap DRDO Scientist | DRDO Scientist Arrested for Providing Confidential Information to Pakistan
Chief Auditor objection | ‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’ | टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश | विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत

Pune Metro Stations | पुणे मेट्रो प्रवाशांसाठी पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकाची नवीन प्रवेशद्वारे उद्यापासून खुली

 

Pune Metro – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सोयीचा व्हावा या उद्देशाने, पुणे मेट्रोने तीन महत्त्वाच्या स्थानकांवरील अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, शनिवार १४ फेब्रुवारी  पासून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांवरील ही नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी खुली केली जाणार आहेत. या नवीन प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांना वर्दळीचे रस्ते ओलांडण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे प्रवाश्यांचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होईलच आणि सुरक्षेमध्ये वाढ होईल. अशी माहिती मेट्रो च्या वतीने देण्यात आली. (Pune Metro News)

 

१. पिंपरी चिंचवड मनपा मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र ३): हे प्रवेशद्वार पुणे मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. हे प्रवेशद्वार सुरू झाल्यामुळे पिंपरी शहरातून मेट्रो स्थानकात येणाऱ्या व स्थानकातून बाहेर जाणाऱ्या प्रवाश्यांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांचीही सोय होणार आहे
२. स्वारगेट मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ५): हे नवीन प्रवेशद्वार MSRTC (एसटी स्टँड) च्या बाजूला उघडणार आहे. हा मार्ग भुयारी असून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकात प्रवेश मिळेल. स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. स्वारगेट परिसरात असणारा जेधे चौक ओलांडण्यासाठी प्रवाश्याना आता मुख्य रस्त्यावर येण्याची गरज भासणार नाही.
३. शिवाजीनगर मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ३): हे प्रवेशद्वार आकाशवाणी केंद्राजवळ, शिमला ऑफिस चौकात आहे. हा मार्ग देखील भुयारी असून, यामुळे गणेशखिंड रस्ता किंवा कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्थानक गाठणे सुलभ होणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचा वापर करणाऱ्या प्रवाश्याना या प्रवेशद्वारामुळे थेट मुख्य रस्त्याशी जोडणी मिळणार आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, “मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सोय लक्षात घेऊन ही नवीन प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या प्रवेशद्वाराचा मोठा फायदा होणारआहे.“

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: