PMC Social Devlopment Department | १० वी १२ वी शिष्यवृत्ती योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ | महापालिका प्रशासनाचा निर्णय
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. तसेच विविध कल्याणकारी योजनासाठी देखील अर्ज मागवले आहेत. या योजनासाठी १० फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नागरिक आणि विद्यार्थी २५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली.
सुरुवातीला १ ऑगस्ट पासून ते ३१ डिसेंबर या कालावधी पर्यंत यासाठी कालावधी देण्यात आला होता. मात्र मधील काळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे यास मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार १० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत असणर आहे. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागा यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज dbt.pmc.gov.in या वेबसाईट वर हे अर्ज भरता येतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
| आता पर्यंत ९ हजार ३५८ अर्ज
दरम्यान या दोन्ही शिष्यवृत्ती योजनासाठी आता पर्यंत एकूण १० हजार ९३१ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यातील ८ हजार २३६ हे १० वी च्या योजनेसाठी तर २ हजार ६८५ हे १२ वी च्या योजनेसाठी आले आहेत.
| विविध कल्याणकारी योजनांसाठी १५३६२ अर्ज
१० वी १२ वी शिष्यवृत्ती योजने सहित विविध कल्याणकारी योजनाना देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याण योजना आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजना यांचा समावेश आहे. या योजनांसाठी आतापर्यंत १५ हजार ३६२ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

COMMENTS