Annasaheb Waghire college Teacher | डॉ. उमेशराज पनेरु यांना उत्कृष्ट क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार

HomeBreaking News

Annasaheb Waghire college Teacher | डॉ. उमेशराज पनेरु यांना उत्कृष्ट क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार

Ganesh Kumar Mule Feb 11, 2026 12:09 PM

Organic Farming | lभविष्यात सेंद्रिय शेतीच माणसाला तारणार | योगेश मनसुख | अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात उभारला गांडूळ खत प्रकल्प
Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे
Annasaheb Waghire College | अभिजात मराठी भाषेला गौरवशाली परंपरा: प्रा. डॉ. वसंत गावडे

Annasaheb Waghire college Teacher | डॉ. उमेशराज पनेरु यांना उत्कृष्ट क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार

 

Sport Award – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथील क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेशराज पदमराज पनेरु यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या ७७ व्या विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त “उत्कृष्ट क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक” (ग्रामीण विभाग) हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pune News)

सदर पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उपकुलगुरू डॉ. पराग काळकर व कुलसचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव मा. संदीप कदम व खजिनदार मा. मोहनराव देशमुख प्रमुख उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, गौरवचिन्ह व मेडल असे होते.

डॉ. पनेरु सप्टेंबर २००८ पासून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात कार्यरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य वृद्धिंगत व्हावे व परिसरात क्रीडा संस्कृती रुजावी या उद्देशाने त्यांनी विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे तीन वर्षे यजमानपद त्यांनी यशस्वीरीत्या भूषविले आहे.

पुरस्कार वितरण समारंभास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. जोत्सना एकबोटे, सागर वैद्य, डॉ. विजय खरे, डॉ. प्रभाकर देसाई, कुलसचिव चारुशीला गायके, क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट, उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. अमृत बनसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

पुरस्कार स्वीकारताना डॉ. पनेरु यांच्यासमवेत त्यांची पत्नी सौ. ममता पनेरु तसेच महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ. वसंत गावडे, डॉ. राजेश रसाळ, डॉ. रमेश काशीदे, डॉ. धनंजय गडगे, डॉ. विनायक कुंडलिक, डॉ. किशोर काळदंते, डॉ. रमेश गोपाळे व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीतील सर्व क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: