PMC Subsidy | राज्य सरकारने पुणे मनपाचे ३०४५ कोटीचे अनुदान दिलेच नाही | मालमत्ता करात वाढ करण्यापेक्षा अनुदान आणण्याची  शहरातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना मागणी

Homeadministrative

PMC Subsidy | राज्य सरकारने पुणे मनपाचे ३०४५ कोटीचे अनुदान दिलेच नाही | मालमत्ता करात वाढ करण्यापेक्षा अनुदान आणण्याची  शहरातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना मागणी

Ganesh Kumar Mule Feb 10, 2026 10:03 PM

PMC Election 2025 -26 | प्रचार सभांच्या परवानगी साठी एक खिडकी योजना | परवाना शुल्क, अनामत रक्कम जाणून घ्या
Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 
Bageshwar Dham Sarkar in Dehu | बागेश्वर धाम सरकार यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी!

PMC Subsidy | राज्य सरकारने पुणे मनपाचे ३०४५ कोटीचे अनुदान दिलेच नाही | मालमत्ता करात वाढ करण्यापेक्षा अनुदान आणण्याची  शहरातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना मागणी

| सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे राज्य शासनाकडून येणे असलेले ३०४५ कोटी रुपये तातडीने मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, अशी मागणी शहरातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे. (Vivek Velankar)

वेलणकर यांच्या निवेदना नुसार  पुणे शहरात होणाऱ्या दस्तांच्या मुद्रांक शुल्काच्या रकमेवर १% दराने अधिभार आकारण्यात येतो व तो शासनाने महापालिकेला अदा करण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र २०१९-२० ते २०२४-२५ या आर्थिक वर्षातील १०७५.५३ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम पुणे महापालिकेस राज्य सरकारकडून अद्याप प्राप्त झालेली नाही.

२०१७ पासून LBT बंद झाल्याने राज्य शासनाकडून पुणे महापालिकेला वस्तू व सेवाकराचे अनुदान प्राप्त होते. २०१७ मध्ये ११ गावे शासनाने पुणे महापालिकेत समाविष्ट केली , मात्र त्यापोटीचे गेल्या आठ वर्षांपासूनचे १४२१.७० कोटी रुपयांचे वस्तू व सेवाकराचे अनुदान अद्याप पुणे महापालिकेस मिळालेले नाही, तसेच २०२१ पासून २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट केली आहेत मात्र त्यापोटीचे आज पर्यंतचे ५७२.२२ कोटी रुपयांचे वस्तू व सेवाकराचे अनुदान अद्याप पुणे महापालिकेस मिळालेले नाही. या सर्वांची गोळाबेरीज करता राज्य शासनाकडून पुणे महापालिकेला ३०४५ कोटी रुपये येणे आहे.

यासंदर्भात पुणे महापालिकेने राज्य शासनाबरोबर भरपूर पत्रव्यवहार केला आहे.  पुणे महापालिकेला विकास कामांसाठी पैसा कमी पडत असल्याने ते केवळ ३०० कोटी रुपयांच्या वाढीव महसुलासाठी सामान्य जनतेवर १०% मालमत्ता करात वाढ लादत आहेत.   त्यामुळे  पुणे महापालिकेचे राज्य शासनाकडून येणे असलेले ३०४५ कोटी रुपये तातडीने मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत. अशी मागणी वेलणकर यांनी शहरातील सर्व मंत्री आणि आमदार यांना केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: