Pune PMC News | नदीकाठ सुधारणा प्रकल्प | १.५० किमी लांबीच्या ट्रॅक चे लोकार्पण महापालिका वर्धापन दिनाला!
Pune River Side Improvement – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका मार्फत नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे नियोजन केले आहे. पुणे शहरातून मुळा – मुठा नदी एकूण 44 की. मी. लांबीची वाहत असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या ३.७. की. मी. लांबीच्या नदी काठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच बंडगार्डन ते मुंढवाच्या ५.५ की. मी. व औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ की. मी लांबीचे काम सुरू करणेत आले आहे. तसेच नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे लागून उपलब्ध जागेमध्ये विविध नागरी सुविधा ( थीम पार्क ) उपलब्ध करून देणेत येणार आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

सध्या पूर्ण झालेल्या १.५० किमी लांबीचा ट्रॅक चे लोकार्पण पुणे महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ फेब्रुवारी रोजी रीतसर लोकार्पण करून नागरिकांना सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान वापरासाठी उपलब्ध करून देणेचे नियोजन आहे. मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यानचे सुमारे ५ की. मी. लांबीचे नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित पक्ष्याचे प्रतिनिधी, पदाधिकारी या सह उच्चपदस्थ मंत्री यांचे हस्ते नजिकच्या कालावधीत लोकार्पण करणेत येणार आहे. जेणेकरून पुणे शहरातील नागरिकांना नैसर्गिक पद्धतीने निर्माण केलेल्या प्रकल्पाचा नागरिक चालणे, सायकलिंग, विरंगुळा व इतर नागरिक यांना सर्व सोईनियुक्त वातावरण मिळू शकेल. असे ही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचे सुमारे ९० % काम पूर्ण झाले आहे. त्यामधील संगमवाडी येथील सुमारे १.५० की. मी लांबीचे काम सर्वार्थानं पूर्ण झाले असून , आज नवल किशोर राम महापालिका आयुक्त यांचे समवेत पृथ्वीराज बि.पी अतिरिक्त महापालिका आयुक्त(इस्टेट)., पवणीत कौर अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त ( विशेष) व प्रशांत वाघमारे शहर अभियंता यांचे समवेत आज रोजी कामाची पाहणी करणेत आली व वृक्षारोपण करण्यात आले.


COMMENTS