Naval Kishore Ram IAS | सर्व उमेदवारांनी अचूक व विहित नमुन्यात खर्च सादर करावेत | महापालिका आयुक्त यांचे आवाहन

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | सर्व उमेदवारांनी अचूक व विहित नमुन्यात खर्च सादर करावेत | महापालिका आयुक्त यांचे आवाहन

Ganesh Kumar Mule Dec 30, 2025 9:18 PM

Pune PMC News | बाणेर बालेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 14650 चौ.फूट विनापरवाना  बांधकाम हटवले
Nilesh Nikam NCP Leader | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी  निलेश निकम यांची नियुक्ती
Pune Shivsena | शिवसेनेच्या वतीने हडपसरमध्ये “व्यसनांची होळी”; जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तरुणांच्या जनजागृतीचा निर्धार

Naval Kishore Ram IAS | सर्व उमेदवारांनी अचूक व विहित नमुन्यात खर्च सादर करावेत | महापालिका आयुक्त यांचे आवाहन

 

PMC Election 2025-26 – (The Karbhari News Service) – सर्व मतदान केंद्रावर ASSUARED MINIMUN FACILITIES पुरविण्यात येणार असून सर्व मतदान केंद्र साहित्य वाटप व स्विकृती केंद्र, मतमोजणी केंद्र या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी दिव्यांग मतदारांकरिता व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष प्रमुखांनी सर्व उमेदवारांनी दररोज विहित नमुन्यात दैनंदिन खर्च निवडणूक खर्च व्यवस्थापन पथकाकडे न चुकता सादर करणे तसेच याकरिता बाबनिहाय रेट लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी सर्व उमेदवारांनी अचूक व विहित नमून्यात खर्च सादर करणेबाबत सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

महानगरपालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांचे अध्यक्षते खाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे ,  उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर यांचे उपस्थितीत पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेणेकरिता सर्व नोडल अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक कामकाज प्रभावीपणे करणे करिता एकूण २४ विषयांकरिता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून खालीलप्रमाणे नोडल अधिकारी यांनी आपल्या विषयाशी निगडीत कामकाजाबाबत सादरीकरण केले त्या मधील ठळक बाबी खालील प्रमाणे-

• मनुष्यबळ व्यवस्थापन – बैठकीमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाने मतदान केंद्राकरिता २४ हजार हून अधिक कर्मचारी उपलब्ध असून प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू असल्या बाबत सांगितले.
• आचारसंहिता कक्ष – मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता विषयक कार्यवाही सुरू असून याकरिता SST,FST,VVT,VST पथके २४*७ कार्यरत असून प्राप्त तक्रारी २४ तासाच्या आत निर्गत करण्यात येत आहेत.आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने १ FIR दाखल करण्यात आला असून जवळपास ८००० + FLEX, BANNER, FLAGS इत्यादी निष्काशीत करण्यात आले. त्याचप्रमाणे ५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर विहित वेळेत कारवाई करण्यात आली.
• ईव्हीएम व्यवस्थापन – निवडणुकी करिता लागणारी ईव्हीएम ९००० उपलब्ध झाले असून उर्वरित मशीन आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त करून घेण्यात येत आहेत तसेच सर्व ईव्हीएम वाहतूक वाहनांना जीपीएस यंत्रणा लावलेली असून पोलीस बंदोबस्तामध्ये वाहतूक करण्यात येत आहे तसेच स्ट्रॉंग रूम अद्ययावत असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील कार्यान्वित केलेले आहेत.
• मतदान साहित्य छपाई – मतदानाच्या दिवशी आवश्यक असणारे सर्व साहित्य छपाई करण्याची कार्यवाही सुरू असून ४०११ मतदान केंद्राकरिता ६५०० साहित्याच्या किट तयार करण्याची कार्यवाही सुरू असून विहित वेळेत पूर्ण होईल. त्याचप्रमाणे मतपत्रिका छापणेकरिता आवश्यक असलेले रंगीत कागद उपलब्ध असून मतपत्रिका छापणेकरिता सर्व तयारी झालेली आहे.
• वाहतूक व्यवस्थापन – वाहतूक व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांना १०५१ वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच वाहतूक आराखडा नकाशासह तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
• टपाली मतपत्रिका – निवडणूक कर्मचारी यांनी ३०,०००+ टपाली मतपत्रिकाकरिता मागणी नोंदवली असून त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.
• माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती- महापालिका स्तरावर सदर समितीचे गठन केले असून यामध्ये इलेक्ट्रानिक जाहिरात पुर्वप्रमाणन व पेड न्युज संदर्भात कार्यवाही करण्यात येत असून आतापर्यंत ९ प्राप्त अर्जांना परवानगी देण्यात आलेली आहे.
• मतमोजणी केंद्र व्यवस्थापन – निवडणूक निर्णय अधिकारी निहाय मतमोजणी केंद्र अंतिम करण्यात आले असून टेबल संख्या, फेरीसंख्या, कर्मचारी नियुक्ती व अनुषंगीक तयारी सुरु आहे.
• एक खिडकी कक्ष – ज्या पद्धतीने थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र देणे करिता ऑनलाईन पद्धतीने कार्यप्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले त्याच पद्धतीने प्रचारासाठी आवश्यक सर्व परवानगी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी सदर प्रणालीव्दारे सर्व परवानगी प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन करणेत आले आहे.

अशाप्रकारे निवडणूक कामकाज प्रभावीपणे पारदर्शकपणे व व्यवस्थितरित्या पार पाडणे बाबत सर्व नोडल अधिकारी यांनी काळजी घेणे बाबत  महानगरपालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी  नवल किशोर राम यांनी निर्देशित केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: