Irrigation : Water Cut for Pune : पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला निषेध

HomeBreaking Newsपुणे

Irrigation : Water Cut for Pune : पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला निषेध

Ganesh Kumar Mule Dec 02, 2021 3:24 PM

Jayant Patil : Murlidhar Mohol : जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज!
Jayant Patil : Murlidhar Mohol : जलसंपदा मंत्र्यांनी भेट नाकारल्याने महापौर नाराज!
Irrigation Dept Vs PMC | वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी!

: पुणेकरांवर पाणीसंकट

पुणे : पुणे शहरावर आगामी काळात पाणी संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. कारण उद्यापासून पाटबंधारे विभाग पुण्याचे पाणी कमी करणार आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हे पाणी कमी केले जाणार आहे. वारंवार सांगूनही महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाच्या या निर्णयाचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निषेध केला आहे.

: वारंवार सांगूनही पाणी कमी केले नाही : पाटबंधारे

पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार पाणीवापर कमी करण्याचे निर्देश  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय व अध्यक्ष का.स.स. तसेच मा.ना दत्तात्रय भरणे राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मद व जलसंधारण बने पदम सामान्य प्रशासन तथा (पालकमंत्री सोलापूर) यांना निर्देश दिलेले होते. तथापि अद्यापही पुणे मनपा खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी केलेला नाही. ही बाब पुन्हा उन्हाळा हंगामाच्या नियोजनाबाबत दि. २६/०३/२०२१ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निदर्शनास आल्याने पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड प्रकल्पातील वापर सुरू केल्यामुळे खडकवासला धरणातील पाणीवापर नियंत्रित /कमी न केल्यास जलसंपदा विभागाने सदरील पाणीवापर कमी करावा असे.  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महोदय यांनी निर्देश दिलेले होते. पुणे महानगरपालिका खडकवासला धरणातून सध्या दैनंदिन सरासरी १४६० एमएलडी पाणीवापर करीत असून भामा आसखेड धरणातूनही १८० एमएलडी व २०० एमएलडी इतका दैनंदिन पाणीवापर करीत आहे. पुणे मनपाचा दैनंदिन पाणीवापर नियंत्रित / कमी करण्याबाबत मा. आयुक्त, पुणे मनपा यांनादेखील कळविण्यात आले होते. तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरास जून जुलै २०२१ मध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याचेही पुणे मनपास अवगत करण्याते आले होते तरीही मनपाने अद्यापही दैनंदिन पाणीवापर नियंत्रित/ कमी केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे २०२१-२०२२ च्या उन्हाळा हंगामामध्ये शेतीसाठी पाणीटंचाई होऊ शकले असे आपणास या विभागामार्फत वारंवार कळविलेले आहे. त्यामुळे, आपण अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेचा दैनिक पाणीवापर
नियंत्रणात न आणल्यामुळे जलसंपदा विभागामार्फत शुक्रवार दि. ०३/१२/२०२१ पासून पाणीवापर नियंत्रणात आणण्यात येणार आहे. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

पुण्याचं पाणी कमी करण्याचा डाव ! : महापौर

पुणेकरांना गरजेचं असणारं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. उद्यापासून पुणे शहराचे पाणी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे, याचा समस्त पुणेकरांच्या वतीनं तीव्र निषेध! असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन १ हजार ४६० एमएलडी पाणी खडकवासलातून आणि ३८० एमएलडी पाणी भामाआसखेडमधून पुरवठा होतोय. परंतु उद्यापासून पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करत आहे.
पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माझी विनंती आहे, पुण्याचं पाणी कृपया कमी करु नका. पाणीगळती थांबवणे, पाणीबचत करणे, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. २४x७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरु असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चीड आणणारा आहे. शेतील पाणी देण्यास आम्हा पुणेकरांचा अजिबातही विरोध नाही. मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये? जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत. असे ही महापौर म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0