Pune BJP | पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश!

Homeadministrative

Pune BJP | पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश!

Ganesh Kumar Mule Dec 20, 2025 7:16 PM

By-election of Kolhapur : भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली ; मात्र जनतेचा कौल मान्य : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
Open Challenge to NCP : Chandrakant patil : राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटलांचे खुलं आव्हान!
Announcement of Higher Education Minister | ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात |उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Pune BJP | पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

| भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

| मुळशी तालुक्यातील भानुदास पानसरे यांच्यासह उबाठाचे अनेक पदाधिकारीही भाजपामध्ये

 

Pune Politics – (The Karbhari News Service) – पुण्यातील शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पुण्यातील उबाठा गटाचे डॉ. अमोल देवडेकर आणि हडपसरचे प्रशांत तुपे यांच्यासह काँग्रेसच्या आजी माजी पदाधिका-यांनीही भाजपा मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. (PMC Election 2025-26)

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार संग्राम थोपटे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

 

 

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने होणारी वेगवान वाटचाल बघून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपावर विश्वास ठेवून हे सर्वजण पक्षात आले आहेत. या सर्वांना उचित न्याय आणि सन्मान दिला जाईल.

यावेळी केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले की, पुण्यातील समाजकार्यामुळे जनमानसात वेगळे स्थान असलेल्या मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाच्या विचारधारेला पाठिंबा देत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यात भाजपाचे हात मजबूत झाले आहेत.

पुण्यातून शप राष्ट्रवादीतून भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये विकास दांगट, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, काँग्रेस नेते व माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कणव चव्हाण, हडपसर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या सौ. वैशाली तुपे, विराजदादा तुपे, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर), राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, इंदिरा तुपे आदींचा समावेश आहे.

मुळशी तालुक्यातील उबाठा गटाचे कार्यकर्ते व पंचायत समिती माजी सभापती भानुदास पानसरे, उपतालुका प्रमुख गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, शप राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आनंद माझिरे, उपाध्यक्ष संतोष पानसरे, सरचिटणीस सुहास पानसरे, उपाध्यक्ष किरण मराठे आदींनीही या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: