PMC Sanitory Inspector | सुरक्षा रखवालदार, बिगारी, गवंडी यांना आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती!
PMC Employees Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत काम करणाऱ्या सुरक्षा रखवालदार, बिगारी, गवंडी, झाडूवाला यांना आरोग्य निरीक्षक (Class 3) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. या बाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी जारी केले आहेत. (PMC Solid Waste Management)
पुणे महापालिकेत काम करण्याचा ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्या आणि शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती दिली जाते. त्यानुसार 7 कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षक (S 13) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेले हे आहेत कर्मचारी
१. उमेश तोडकर – सुरक्षा रखवालदार
२. जितेंद्र सर्वगोड – झाडूवाला
३. संतोष वाघमारे – बिगारी
४. संतोष गिते – सुरक्षा रखवालदार
५. राजू शेख – गवंडी
६. सिद्धार्थ बागुल – ड्रेनेज बिगारी
७. राजाराम लोखंडे – शिपाई

COMMENTS