Chhatrapati Sambhaji Maharaj Statue | महंमदवाडीत उभारला जाणार  छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता

Homeadministrative

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue | महंमदवाडीत उभारला जाणार  छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता

Ganesh Kumar Mule Dec 13, 2025 8:32 PM

Maharashtra Gad Kille | UNESCO | महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव
Video | Pune Truck Accident | खड्ड्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यात अखेर यश! Video देखील पहा
Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue | महंमदवाडीत उभारला जाणार  छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  प्रभाग क्र. २६ मधील महंमदवाडी, रहेजा सर्कल चौक येथे धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे.  श्री. सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळ ट्रस्ट, महंमदवाडी या संस्थेमार्फत स्वखर्चातून हा पुतळा उभारला जाणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच  शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून  मुख्य सभेची मान्यता देण्यात आली. (PMC General Body Meeting)

प्रभाग क्र. २६ मधील महंमदवाडी, रहेजा सर्कल चौक येथे धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविणे या बाबत माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख  प्रमोद उर्फ नाना वसंत भानगिरे यांनी पत्र दिले होते. पत्रामध्ये श्री. छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा श्री. सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळ ट्रस्ट, महंमदवाडी या संस्थेमार्फत स्वखर्चातून बसवून पुणे महानगरपालिकेला ताबा देणार असल्याचे नमूद केले आहे. या  कामासाठी श्री. सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळ ट्रस्ट, महंमदवाडी या संस्थेमार्फत नेमण्यात आलेल्या आर्किटेक्ट शुभम बिबवे यांनी दिलेल्या नकाशानुसार चौथ-याची उंची ६.३० मी. असून धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळयाची उंची ७.६० मी. (२५ फुट) दर्शविण्यात आली आहे.

हे  काम शिल्पकार महेंद्र थोपटे यांना दिले असून पुतळयाची उभारणी ब्रांझ धातूमध्ये होणार असून यासाठी structural Design  प्रशांत गुलाबराव नाझरेकर, आर.सी.सी. डिझाईनर यांचेकडून घेण्यात येणार असून structural stability report देणार आहेत.

आता  मुख्य सभेची  मान्यता प्राप्त झाल्यांनतर विविध शासकीय विभागांचे अभिप्राय घेण्याची कार्यवाही भवन रचना विभागाकडून करण्यात येणार आहे.
सर्व अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर  शासन निर्णयानुसार  जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या पुतळा समितीची पुतळा उभारणेस मान्यता घेणेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: