MPSC Exam Timetable  | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

Homeadministrative

MPSC Exam Timetable  | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

Ganesh Kumar Mule Dec 02, 2025 9:58 PM

CM Devendra Fadnavis in Davos | दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार!
Anti Addiction Camp |महसूलासाठी सरकारचे व्यसनाला प्रोत्साहन – अविनाश पाटील यांचा आरोप
Antyodaya Sharmik Suraksha Yojana | अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना (ASSY) काय आहे ! जाणून घ्या फायदे 

MPSC Exam Timetable  | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

 

MPSC Exam – (The Karbhari News Service) – शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.inhttp://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविली आहे. (Pune News)

प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन २०२६ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२५, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-२०२६, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ इत्यादी परीक्षा होणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0