Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेचा लाभ घेतलेल्या १ लाख ४० हजार लोकांना देखील मिळणार अभय योजनेचा लाभ | स्थायी समितीची मान्यता!

Homeadministrative

Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेचा लाभ घेतलेल्या १ लाख ४० हजार लोकांना देखील मिळणार अभय योजनेचा लाभ | स्थायी समितीची मान्यता!

Ganesh Kumar Mule Nov 28, 2025 7:22 PM

Pune Rajaram Bridge | राजाराम पुलाची दुरुस्ती सुरू | वाहतुक कधी राहणार बंद! जाणून घ्या
Mahatma Phule Mandai | Pune | मेट्रो आणि पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने  महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट
Ajit Pawar | Chandrakant Patil | मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन

Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेचा लाभ घेतलेल्या १ लाख ४० हजार लोकांना देखील मिळणार अभय योजनेचा लाभ | स्थायी समितीची मान्यता!

| महापालिकेला मिळणार  ९३५ कोटी | १ डिसेंबर पासून अंमल केला जाणार

 

 

 

Pune Propoerty Tax – (The Karbhari News Service) – महापालिका मिळकत कर विभागाच्या वतीने अभय योजना राबवण्यात येत आहे.  या योजनेत यापूर्वी (वर्ष  २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२) या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता मागील योजनेत लाभ घेतलेल्या मिळकत धारकांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  मागील योजनांचा लाभ घेतलेले १ लाख ४० हजार ४३७ मिळकत धारक आहेत. त्यांना १ डिसेंबर पासून लाभ देणे सुरु केले जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (PMC Property Tax Department)

 

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आणि समाविष्ट गावातील सर्व मिळकतधारकांसाठी महत्वाची योजना आणण्यात आली आहे. करदात्यांना थकीत दंडावर  ( Penalty) विशेष सूट देण्यासाठी अभय योजना २०२५ – २६ ही  १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही अभय योजनेत  थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या २% व्याजाच्या रकमेवर ७५% सूट मिळणार आहे. (Pune Municipal Corporation Property Tax Department)

 

|  १ लाख ४० हजार ४३७ मिळकत धारकाकडे ९३५ कोटींची थकबाकी

 

दरम्यान महापालिका प्रशासनाने ही योजना राबवताना असा निर्णय घेतला होता कि, वर्ष  २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२ या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही. असे एकूण १ लाख ४० हजार ४३७ लोक आहेत. त्यांच्याकडील थकबाकी ही ९३५ कोटी इतकी आहे. या मिळकत धारकांना योजनेचा लाभ हा १ डिसेंबर पासून दिला जाणार आहे. योजना १५ जानेवारी पर्यंत असणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: