PMC Election Ward 4 | प्रभाग क्रमांक ४ अ मधून माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांचा जोर | काम आणि स्वतःची प्रतिमा हा ठरणार करिष्मा
Bhaiyyasaheb Jadhav PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षण देखील जाहीर झाले आहे. यात प्रभाग क्रमांक ४ अ अर्थात वाघोली – खराडी या प्रभागात अनुसूचित जाती चे आरक्षण पडले आहे. त्यामुळे इथे माजी नगरसेवक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब जाधव यांचा जोर चालणार अशी चर्चा केली जात आहे. कारण जाधव यांचे सातत्याने सुरु असलेले काम आणि त्यांची स्वतःची उजळ प्रतिमा यामुळे त्यांचा या निवडणुकीत करिष्मा पाहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (PMC Election 2025)
पुणे महापालिका निवडणुक २०२५ ने आता गती घेतली आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्या नंतर निवडणुकीचे आरक्षण देखील घोषित झाले आहे. डिसेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू केली जाईल, अशी चर्चा देखील केली जात आहे. त्यामुळे इच्छुक देखील कामाला लागले आहेत. कोण कुठून उभा राहील, याचे चित्र स्पष्ट झाल्याने सर्वांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात काही माजी नगरसेवकांचे चित्र स्पष्ट झाल्याने ते देखील झाडून कामाला लागले आहेत. प्रभाग क्रमांक ४ अर्थात वाघोली खराडी मधील अ हा वार्ड अनुसूचित जाती साठी आरक्षित झाला आहे. या मधून माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव हे इच्छुक होते. आरक्षण त्यांच्या सोयीचे झाल्याने आता जाधव संबंधित प्रभागातून जोरदार तयारी करत आहेत.
जाधव हे आमदार बापूसाहेब पठारे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जातात. पठारे यांच्यासोबत ते २०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकी पासून सोबत आहेत. नुकत्याच म्हणजे २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी पूर्ण मतदार संघाचा दौरा करत पठारे यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जाधव हे आमदार पठारे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
या वार्डात जाधव यांचा जोर दिसणार आहे, असे मानले जात आहे. त्याला कारणे देखील तशीच आहेत. ज्यावेळी शहरात कोरोना ने थैमान घातले होते, तेव्हा लोक घरात बसून होते, जाधव मात्र आपल्या प्रभागातील लोकामध्ये फिरून त्यांचे मनोबल वाढवत होते, त्यांना धीर देत होते. त्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. लोकांना प्रत्यक्ष भेटता येत नाही म्हणून भोंगा घेऊन ते लोकांमध्ये जनजागृती करत होते. त्यांचे हे काम लोकांना चांगले भावले होते.
शिवाय प्रभागातील मुलभूत समस्यांसाठी त्यांनी वारंवार आंदोलने केली आहेत. प्रभागातील पाणी समस्येसाठी त्यांनी महापालिकेत अर्ध मुंडन आंदोलन केले होते. प्रभागातील स्मशानभूमी साठी चितेवर झोपुन त्यांनी आंदोलन केले होते. नुसतेच आंदोलन नाही केले तर त्यांनी ते काम पूर्ण देखील करून घेतले होते. त्यामुळे लोक त्यांना कामाचा माणूस असे संबोधू लागले आहेत.
नगरसेवक असताना जाधव यांनी महापालिका सभागृहात आपल्या प्रभागाची बाजू सक्षमपणे मांडली आणि मुलभूत कामे करून घेतली. जाधव यांनी नुसतेच प्रभागाचाच विचार नाही तर शहराचा विचार केलेला संपूर्ण सभागृहाने पाहिले. यात अजून एक जमेची बाजू म्हणजे जाधव हे माजी न्यायाधीश आहेत. कायदा त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. स्व चा विचार न करता त्यांनी नेहमी लोकांचा विचार केला. त्यामुळे राजकारणात त्यांची एक उजळ प्रतिमा तयार झाली आहे. याचा फायदा जाधव यांच्यासोबत त्यांच्या पक्षाला देखील होणार आहे.

COMMENTS