PMC 23 Merged Villages STP and Drainage Lines | समाविष्ट २३ गावात ड्रेनेज लाईन आणि  मैलापाणी  शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १४३७ कोटींचा डीपीआर!

Homeadministrative

PMC 23 Merged Villages STP and Drainage Lines | समाविष्ट २३ गावात ड्रेनेज लाईन आणि  मैलापाणी  शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १४३७ कोटींचा डीपीआर!

Ganesh Kumar Mule Nov 12, 2025 6:52 PM

Pune PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या १३१ कर्मचारी व अधिकारी यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणगौरव!
PMC Officers | वारंवार बदली होऊनही काही अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेचा ‘मोह’ सुटेना | ‘आर्थिक’ राजधानीत सगळी ‘प्रतिभा’ पणाला लावून महत्वाची खाती मिळण्याची “आशा”!
PMC Election Final Ward Structure 2025 | पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता  | गॅझेटमध्ये सोमवारी प्रसिद्ध होणार!

PMC 23 Merged Villages STP and Drainage Lines | समाविष्ट २३ गावात ड्रेनेज लाईन आणि  मैलापाणी  शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १४३७ कोटींचा डीपीआर!

| समाविष्ट गावातील मैलापाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये मास्टर प्लॅन नुसार ड्रेनेज लाईन विकसित करणे व मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे या कामाचा  1437.94 कोटी इतक्या रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. हा अहवाल  शहर सुधारणा समितीमार्फत  मुख्य सभेची मान्यता घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

| गावांची 2011 प्रमाणे 1.85 लक्ष लोकसंख्या

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये  शासन निर्णयानुसार नव्याने 23 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. मौजे म्हाळुंगे, बावधन बु. सुस, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु, नन्हे, होळकरवाडी, अवताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणस नगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली या गावांचा समावेश झाला असून सदर गावांचे एकूण क्षेत्रफळ 184.61 चौरस किलोमीटर आहे. तसेच  गावांची 2011 प्रमाणे 1.85 लक्ष लोकसंख्या आहे.

| 2054 मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून नियोजन

नव्याने समाविष्ट गावांमध्ये मलनिःसारण योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेसाठी मलनिस्सारण  खात्यामार्फत रीतसर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.  हे काम  सल्लागार प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रा.लि. पुणे यांचेमार्फत काम करून घेणेस व त्यांचेशी करारनामा करणेस स्थायी समिती ची मान्यता प्राप्त झाली असून ये त्यांना कार्यादेश देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तज्ञ सल्लागार प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रा.लि. पुणे यांचे मार्फत सदर गावांचा मलनिःसारण योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे.  अहवालात समाविष्ट गावांची 2054 मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसार मलवाहिन्या व मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP) यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 608.17 किलोमीटर मलवाहिनी व 2015 एम एल डी क्षमतेचे एकूण 08 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP) उभारण्याचा समावेश आहे. सदरच्या प्रकल्पामुळे नव्याने समाविष्ट गावातील मैलापाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून परिसरातील दुर्गधी व अनारोग्यकारक परिस्थिती दूर होण्यास मदत होणार आहे.

| शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

तज्ञ सल्लागार  कन्सल्टंट  यांनी सदर गावांमध्ये मलनिसारण योजना राबविण्यासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) यांचेकडील  2023-24 च्या दरपत्रकानुसार तयार करण्यात आलेल्या 1437.94 कोटी रकमेच्या प्रकल्पाच्या पूर्वगणनपत्रकास तांत्रिक छाननी समिती पुणे महानगरपालिका यांची देखील मान्यता प्राप्त आहे. त्यानुसार  प्रकल्प अहवाल शहर सुधारणा समिती मार्फत मुख्य सभेच्या मान्यते साठी ठेवण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: