Dr Siddharth Dhende | धाराशिव मधील वाघोलीतील पुरग्रस्तांना मदतीचा हात  – प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा पुढाकार ; डॉ. धेंडे यांचे मार्गदर्शन

HomeBreaking News

Dr Siddharth Dhende | धाराशिव मधील वाघोलीतील पुरग्रस्तांना मदतीचा हात – प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा पुढाकार ; डॉ. धेंडे यांचे मार्गदर्शन

Ganesh Kumar Mule Oct 07, 2025 9:44 PM

Baramati Loksabha Consistency | बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा | खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
NCP – Sharadchandra Pawar Manifesto | देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे | शरद पवार यांची ‘शपथनामा’ मधून भाजप वर सडकून टीका 
ZP Transfer Policy | जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणात अविवाहित महिलांचा समावेश करावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Dr Siddharth Dhende | धाराशिव मधील वाघोलीतील पुरग्रस्तांना मदतीचा हात

– प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा पुढाकार ; डॉ. धेंडे यांचे मार्गदर्शन

 

Marathwada Flood – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक कुटुंबांचे, जनावरांचे तसेच शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील दानशूर व्यक्ती, व्यापारी संघटना, डॉक्टर आणि केमिस्ट, पथारी संघटना, रिक्षा संघटना आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते पुढे येत सढळ हाताने मदतीसाठी धावून आले आहेत. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. धाराशिव जिल्ह्यातील वाघोली गावातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप केले.

या मदतीत तांदूळ, गहू, डाळी, बेसन, साखर, तेल, हळद, मसाले, मिठ, चहापत्ती, गोडा मसाला, शालेय साहित्य, कपडे, बिस्किटे आणि इतर गृहउपयोगी वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त वाघोली गावाला दत्तक घेऊन तेथील बाधित कुटुंबांना देण्यात आली.

या उपक्रमासाठी अनिल कांबळे, संदीप चाबुकस्वार, विनायक महाडीक आणि बाळा महाडीक यांनी प्रत्यक्ष वाघोली येथे जाऊन मदत साहित्य वाटप केले.

या जनसेवा उपक्रमाचे मार्गदर्शन माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी केले.

—–

पुरामुळे मराठवाडामधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत देणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून अनेक नागरिक पुढे येत आहेत. प्रभाग क्रमांक दोन मधील दानशूर नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेतला. त्याबद्दल त्याचे आणि सर्व संघटनांचे आभार.

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: