Wadgaon Budruk Pune | मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी वडगाव बुद्रुकमधील नागरिकांचा मदतीचा हात

HomeBreaking News

Wadgaon Budruk Pune | मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी वडगाव बुद्रुकमधील नागरिकांचा मदतीचा हात

Ganesh Kumar Mule Oct 06, 2025 9:56 PM

MP Supriya Sule Marathi news |  रखरखत्या उन्हात  प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्या खासदार सुप्रिया सुळे
Environmental Accountability And Sustainability | ‘पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता’ विषयावर २६ एप्रिल रोजी राष्ट्रीय परिसंवाद
PMC Marathi Bhasha Samiti | पुणे मनपा मराठी भाषा संवर्धन समिती कागदावरच | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन

Wadgaon Budruk Pune | मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी वडगाव बुद्रुकमधील नागरिकांचा मदतीचा हात

| श्री साई सेवा मंदिर ट्रस्ट व नागरिकांचा सामाजिक उपक्रम – आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते मदतवाहिनीला शुभाशिर्वाद

 

Marathwada Rain – (The Karbhari News Service) – अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने मराठवाड्यातील अनेक गावांतील शेतकरी, नागरिक, महिला आणि लहान मुले सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान, घरांचे पडझड, आणि अन्नधान्याचा तुटवडा अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील श्री साई सेवा मंदिर ट्रस्ट, तसेच गावातील नागरिक पुढे सरसावले आहेत. श्री साई सेवा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वाखाली तब्बल साडेतीन टन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्य संकलित करण्यात आले. या सर्व वस्तू मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आल्या. मदतवाहिनी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे पूजन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. (Haridas Charwad)

या वेळी आमदार तापकीर यांनी सांगितले की, “आपत्तीच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा आहे. वडगाव बुद्रुककरांनी दाखवलेले हे उदाहरण संपूर्ण पुण्याला प्रेरणादायी आहे.”

मराठवाड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी ₹21,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या वतीने आमदार तापकीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. “ही छोटी मदत असली तरी ती शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे चरवड यांनी सांगितले.
या मदत उपक्रमात भाजपा वडगाव-धायरी मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे, सरचिटणीस शहाजी वांजळे, सौ.कोमलताई कुटे , सामाजिक कार्यकर्ते सुहास पवार, अनंता बनकर, चंद्रकांत पवळे, डॉ. विवेक काळे, जितेंद्र चंपानेरकर, केदार जाधव, बोरसे साहेब, अनंता बनकर, उन्मेष निजामपूरकर ,मनोज वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अनंता कांबळे, नंदकिशोर गोसावी आणि वडगाव बुद्रुक परिसरातील अनेक तरुण स्वयंसेवकांनी साहित्य संकलन, वर्गीकरण आणि वाहतुकीची जबाबदारी अत्यंत उत्साहाने पार पाडली.

या संपूर्ण मोहिमेत गावकऱ्यांनी एकजुटीने भाग घेतला. अनेक नागरिकांनी धान्य, तांदूळ, गहू, डाळी, बिस्किट पॅकेट्स, साबण, शालेय वह्या, पेन्सिली, कपडे इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात दिल्या. महिलांनीही या उपक्रमात सहभाग घेत घरगुती बनवलेल्या वस्तू दान केल्या.

ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास चरवड म्हणाले, “मराठवाडा आपला परिवार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होणं हीच खरी सेवा आहे. आमदार तापकीर यांच्या प्रोत्साहनामुळे आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे कार्य यशस्वी झाले.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: