PMC Service Portal | पुणे महानगरपालिकेचे सेवा पोर्टल | ९७ सेवांचा लाभ घ्या घरबसल्या
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेद्वारे नागरिक तसेच व्यवसायिकांसाठी सुलभतेच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत सेवा पोर्टल विकसित करण्यात आले आहे. अशी माहिती महापलिका माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC IT Department)
या मध्ये पुणे महानगरपालिकेद्वारे अधिसूचित करण्यात आलेल्या ९७ सेवा, सदर पोर्टल मार्फत देण्यात येतात. आरोग्य; मिळकत कर, पाणी पुरवठा, बांधकाम परवानगी, अग्निशमन, आकाशचिन्ह, अतिक्रमण, रस्ते, मल:निस्सारण, उद्यान या विभागांच्या सेवा देण्यात येतात. विवाह नोंदणी, कुत्रा / मांजर बाळगणे परवाना, नळ जोडणी, आकाशचिन्ह परवाना, इत्यादि सेवा देण्यात येतात. अद्ययावत पोर्टल द्वारे नागरिकांना घरबसल्या अधिक सुलभतेने सेवांचा लाभ घेणे शक्य आहे. नवीन पोर्टल मध्ये UI/UX मध्ये बदल करण्यात आला आहे जेणेकरून नागरिकांना सेवा पोर्टलचा वापर सोप्या पद्धतीने करण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून मान्यता प्राप्त झाल्यानंतर पुढील टप्प्यात पेमेंट साठी विविध पर्याय, जसे की यूपीआय, क्रेडिट कार्ड, RTGS इत्यादि उपलब्ध आहेत.
अधिकाऱ्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने विविध टप्प्यांवर मान्यता दिली जाते. सदर पोर्टल अद्ययावत करण्यात आले असून ते कामकाजास अधिक सोपे व सुलभ झाले आहे. नवीन पोर्टल मध्ये ई सिग्नेचर देण्यात आले असून ई सिग्रेचर आधारित प्रमाणित सेवा उपलब्ध आहे.
नवीन पोर्टल मध्ये देण्यात येणारे प्रमाणपत्रे, ना हरकत प्रमाणपत्र, ना देयक प्रमाणपत्रे तसेच परवाने यांच्यावर अधिकारी यांच्या ई सिग्नेचर संलग्न आहेत.
नवीन पोर्टल द्वारे विविध सेवांची प्रमाणपत्रे / परवाने करिता ई सिग्नेचर होऊन सदर सेवा प्रमाणपत्र, परवाने whatsApp द्वारे थेट नागरिक व व्यावसायिकांच्या मोबाईलवर देण्यात येत आहेत.
whatsApp द्वारे सेवा देणारी पुणे महानगरपालिका महाराष्ट्रातील अग्रगण्य महानगरपलिका आहे. थेट पुणे मनपा मध्ये किंवा क्षेत्रीय कार्यालया मध्ये न येता नागरिकांना सुलभ सेवा पुरविण्यास मदत होणार आहे.
नवीन प्रणालीचे लोकार्पण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यामार्फत करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त (जनरल) एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे व ई-प्रशासक राहुल जगताप तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

COMMENTS