Investment Tips | महापालिका कर्मचाऱ्यांनो तुम्हाला गुंतवणूक आणि वित्तीय नियोजनात रुची आहे का? असेल तर महापालिकेत होणारे हे व्याख्यान चुकवू नका 

Homeadministrative

Investment Tips | महापालिका कर्मचाऱ्यांनो तुम्हाला गुंतवणूक आणि वित्तीय नियोजनात रुची आहे का? असेल तर महापालिकेत होणारे हे व्याख्यान चुकवू नका 

Ganesh Kumar Mule Oct 01, 2025 9:12 PM

How to Win in New Year 2024 Hindi Summary | 2024 में कैसे जीतते रहें? जानें 8 तरीके
30th September Deadline |  30 सप्टेंबरची अंतिम मुदत जवळ येत आहे | ही कामे लवकर उरकून घ्या 
How to win in New Year 2024 | 2024 या वर्षात कसे जिंकत राहाल? 8 पद्धती जाणून घ्या

Investment Tips | महापालिका कर्मचाऱ्यांनो तुम्हाला गुंतवणूक आणि वित्तीय नियोजनात रुची आहे का? असेल तर  महापालिकेत होणारे हे व्याख्यान चुकवू नका

 

 

PMC Employees and Officers – (The Karbhari News Service) – भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड (SEBI) व NSDL यांचे मार्फत  ६ ते १२ ऑक्टोबर  या कालावधीत “जागतिक गुंतवणूकदार जागरूकता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता “गुंतवणूक आणि वित्तीय नियोजन” संदर्भात ६ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

या व्याख्यानात बचतीबद्दल मूलभूत ज्ञान, बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर, गुंतवणुकीची मान्यताप्राप्त उत्पादने आणि गुंतवणूक करताना काय करावे आणि काय करू नये इत्यादी गोष्टींचा समावेश केला जाणार असून, SEBI आणि NSDL संस्थेकडील प्रख्यात वक्ते या सत्राचे मार्गदर्शन करणार आहेत.

यात हे विषय समाविष्ट केले जातील:

•आर्थिक फसवणुकीबद्दल जागरूकता
• आर्थिक नियोजनाचे व्यावहारिक ज्ञान कार्यालय परिपत्रक
• गुंतवणूकदारांसाठी काय करावे आणि काय करू नये
• सायबर आर्थिक फसवणुकीसाठी खबरदारी
• निवृत्ती सुरक्षित आर्थिक पद्धती
• कर संबंधित गुंतवणूक धोरणे

या अनुषंगाने SEBI आणि NSDL यांचेकडून पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे करिता  ०६ ऑक्टोबर  रोजी दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत मा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी. बी. हॉल), मनपा मुख्य इमारत, येथे मार्गदर्शनपर व्याखान आयोजित करण्यात आले आहे.

तरी पुणे महानगरपालिकेकडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सदर व्याख्यानास उपस्थित राहावे. असे आवाहन () सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: