PMC Merged 23 Villages | २३ गावांच्या अधिकारा बाबत पाठपुरावा करण्यासाठी एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Homeadministrative

PMC Merged 23 Villages | २३ गावांच्या अधिकारा बाबत पाठपुरावा करण्यासाठी एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Sep 15, 2025 8:21 PM

PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 
PMPML | पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड | १० मार्च पासून होणार कार्यवाही.
PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 

PMC Merged 23 Villages | २३ गावांच्या अधिकारा बाबत पाठपुरावा करण्यासाठी एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा पालकमंत्री  अजितदादा पवार यांनी  पीएमआरडीए चे आयुक्त योगेश म्हसे (IAS) यांना  २३ गावांच्या बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमसी कडे द्यावेत असे आदेश दिले. गावांच्या अधिकारा बाबत पाठपुरावा करण्यासाठी एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

माजी नगरसेवकांच्या निवेदना नुसार  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या २३ गावांच्यातील अमेनिटी स्पेस  एकूण ४९०७ गुंठे  म्हणजे जवळपास १२२ एकर जमीन विना मोबदला पीएमआरडीएकडे हस्तांतरित झाली आहे. अशा एकूण २३ गावांपैकी १० गावांच्या मध्ये ७२ जागा या अमिनेटी स्पेस म्हणून ताब्यात आलेल्या आहेत.
अशा जागा पीएमआरडीए कडून तातडीने आपल्याकडे वर्ग करून त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा देणे सहज शक्य आहे. केशवनगर, मांजरी, वाघोलीतील नागरिकांचा महिलांचा जो आक्रोश होता, तो पीएमआरडीएच्या निष्क्रियतेचा पाढा वाचत होते. या विषयाचा पाठपुरावा करून सदर जागा पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करून बांधकाम परवानगीचे अधिकार देखील  घेण्यासाठी प्रयत्न करावा. कारण विकसन शुल्क हे पीएमआरडीए घेत आहे आणि विकास करत नाही विकास कामे आणि दैनंदिन कामे करण्यासाठी आपल्याकडे बोट दाखवत आहे.  या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सन्माननीय पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर पाठपुरावा करण्यासाठी एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: