PMC Ward 33 – Shivane Khadakwasla | प्रभाग क्रमांक – ३३ – शिवणे- खडकवासला | प्रभागाची रचना सविस्तर जाणून घ्या  

Homeपुणे

PMC Ward 33 – Shivane Khadakwasla | प्रभाग क्रमांक – ३३ – शिवणे- खडकवासला | प्रभागाची रचना सविस्तर जाणून घ्या  

Ganesh Kumar Mule Sep 10, 2025 9:22 PM

Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 
MP Supriya Sule | NCP Youth | सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक
Sinhgad Road Flyover | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

PMC Ward 33 – Shivane Khadakwasla | प्रभाग क्रमांक – ३३ – शिवणे- खडकवासला | प्रभागाची रचना सविस्तर जाणून घ्या

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – सणसनगर, नांदोशी, राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी, खडकवासला, किरकीटवाडी, कोंढवे धावडे, कोपरे गाव, नांदेड, असे परिसर शिवणे खडकवासला या प्रभागात येतात. प्रभागाची व्याप्ती आणि रचना आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC)

 

प्रभाग क्रमांक – ३३ – शिवणे- खडकवासला

लोकसंख्या – एकूण -८७८१४ – अ. जा. १०१५१ – अ. ज. १७३९

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: सणसनगर, नांदोशी, राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी, खडकवासला, किरकीटवाडी, कोंढवे धावडे, कोपरे गाव, नांदेड, शिवणे (पार्ट) उत्तम नगर, डी.एस. के. विश्व परिसर, रायकर मळा परिसर, धायरी गारमाळ परिसर, महादेव नगर, नांदेड सिटी, केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्र इ.

उत्तर : मौजे भूकुम व कोंढवे धावडेची हद्द कोंढवे धावडेच्या उत्तरेस मिळते, तेथून पूर्वेस कोंढवे धावडेच्या उत्तर हद्दीने व पुढे मौजे शिवणेच्या हद्दीने व पुढे मौजे शिवणे व वारजे यांच्या सामायिक हद्दीने वारजे-एनडीए रस्त्यास गणपतीमाथा येथे मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस वारजे-एनडीए रस्त्याने व पुढे पश्चिमेस दुधाने हाईट्स आणि सदगुरू रेसिडेन्सी यांच्या उत्तरेकडील हद्दीने तेथून पुढे पश्चिमेस शिवणे नांदेड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस शिवणे नांदेड रस्त्याने मुठा नदीस मिळेपर्यंत.

पुर्वः शिवणे नांदेड रस्ता मुठा नदीस जेथे मिळतो तेथून पश्चिम- दक्षिणेस मुठा नदीने मौजे नांदेड व वडगाव खुर्द यांच्या सामायिक हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने सिंहगड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सिंहगड रस्त्याने मौजे नांदेड व मौजे धायरी यांच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस सदर हद्दीने बारंगणी मळा रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, (श्रीराम कॉर्नर सोसायटीच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्ता) तेथून पूर्वेस सदर सरळ रेषेने व पुढे बारंगणी मळ्याच्या रस्त्याने धायरी डी.एस.के. विश्व रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस उंबऱ्या गणपती चौकात (कै संतोष चव्हाण रस्ता ) धायरी गावठाण कडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस धायरी जुना वॉर्ड क्र. ४ व ५ च्या पश्चिमेकडील हद्दीने मौजे धायरी व किरकिटवाडी. नांदोशी, सणसनगर यांच्या सामायिक हद्दीने कोळेवाडी व सणसनगर यांच्या सामायिक हद्दीस मिळेपर्यंत.

दक्षिण : मौजे सणसनगरची पूर्वेकडील हद्द कोळेवाडी हद्दीस जेथे मिळते, तेथून पश्चिमेस सणसनगर गावाच्या पश्चिम हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः मौजे सणसनगरची पश्चिम हद्द दक्षिणेपासून सुरू होते तेथून उत्तरेस मौजे सणसनगर, नांदोशी, खडकवासला, कोंढवे धावडे, गावांच्या पश्चिम हद्दीने मौजे कोंढवे धावडे उत्तर हद्दीस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

PMC Ward 33 – Shivane Khadakwasla Map

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: