PMC Ward 26 – Guruwar Peth Ghorpade Peth | प्रभाग क्रमांक – २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ | मध्यवर्ती भागातील या प्रभागाची व्याप्ती आणि रचना जाणून घ्या

Homeadministrative

PMC Ward 26 – Guruwar Peth Ghorpade Peth | प्रभाग क्रमांक – २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ | मध्यवर्ती भागातील या प्रभागाची व्याप्ती आणि रचना जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Sep 07, 2025 8:24 AM

PMC Ward 11 – Rambaugh Colony Shivtirthnagar | प्रभाग क्रमांक ११ – रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर   –  प्रभागाची व्याप्ती आणि सविस्तर माहिती जाणून घ्या
PMC Draft Ward Structure 2025 | राजकीय सोयीची प्रभाग रचना | शिवसेना नेते प्रशांत बधे यांचा आरोप
PMC Ward 1 – Kalas – Dhanori | प्रभाग क्रमांक १ – कळस – धानोरी | प्रभागाची व्याप्ती, लोकसंख्या असे सर्व काही जाणून घ्या 

PMC Ward 26 – Guruwar Peth Ghorpade Peth | प्रभाग क्रमांक – २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ | मध्यवर्ती भागातील या प्रभागाची व्याप्ती आणि रचना जाणून घ्या

 

Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ हा शहराच्या  मध्यवर्ती भागातील प्रभाग आहे. हरकती आणि सूचना नोंदवण्याच्या शेवटच्या दोन दिवसात या प्रभागासाठी १३ हरकती आल्या होत्या. महात्मा फुले पेठ पासून ते मुख्य अग्निशामक केंद्र पर्यंत या प्रभागाची व्याप्ती आहे. या प्रभागाची रचना आपण सविस्तर जाणून घेऊयात. (PMC Pune Election 2025)

 

प्रभाग क्रमांक – २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ

लोकसंख्या एकूण – ७६२६४ – अ. जा. -९१४९ – अ. ज. – ४४०

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

 

व्याप्ती: महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट, स्वारगेट पोलीस लाईन, खडक पोलीस लाईन, खडकमाळ आळी, मनपा कॉलनी नं. ७, डॉ. कोटणीस दवाखाना, शितळा देवी मंदिर परिसर, मामलेदार कचेरी, घोरपडे उद्यान, मोमीनपूरा परिसर, मनपा कॉलनी नं. ८ व ९. पंच हौद मिशन, आचार्य विनोबा भावे मनपा शाळा, महात्मा फुले स्मारक सावित्रीबाई फुले स्मारक, मुख्य अग्निशामक केंद्र इ.

उत्तर: छ. शिवाजी रस्त्यास मिर्झा गालीब रस्ता रामेश्वर चौकात जेथे मिळतो, तेथून पूर्वेस मिर्झा गालीब रस्त्याने महाराणा प्रताप रस्त्यास गोविंदहलवाई चौकात मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस महाराणा प्रताप रस्त्याने कस्तुरी चौकात महात्मा फुले रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस महात्मा फुले रस्त्याने शंकरशेट टेंबेकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने लक्ष्मीनारायण अपार्टमेंटच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने दत्तोबा कोंढरे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने मिर्झा गालिब रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्वः मिर्झा गालिब रस्ता जवाहरलाल नेहरु रस्त्यास जेथे मिळतो. तेथून दक्षिणेस जवाहरलाल नेहरु रस्त्याने सोनवणे हॉस्पिटल जवळ महामुनी मार्कडेय रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस महामुनी मार्कडेय रस्त्याने मनपा कॉलनी क्र. ८ च्या पूर्वेकडील सिमाभिंतीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस मनपा कॉलनी क्र. ८ व ९ च्या पूर्वेकडील सिमाभिंतीने (इनामके मळ्याच्या पश्चिमेकडील सिमाभिंतीने) व पुढे महात्मा गांधी विद्यालयाच्या पूर्वेकडील सिमाभिंतीने दाऊदी बोहरा कब्रस्थानच्या उत्तरेकडील सिमाभिंतीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस दाऊदी बोहरा कब्रस्थानच्या सिमाभिंतीने नागझरी नाल्यास मिळेपर्यंत तेथून उत्तर-पूर्वेस नागझरी नाल्याने न्यू कल्पतरू सोसायटीच्या उत्तर हद्दीच्या रेषेस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्याने शंकरशेठ रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिणः पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता शंकरशेठ रस्त्यास जेथे मिळतो तेथून पश्चिमेस शंकरशेठ रस्त्याने छ. शिवाजी रस्त्यास केशवराव जेधे चौकात मिळेपर्यंत.

 

पश्चिम :  शंकरशेठ रस्ता छ. शिवाजी रस्त्यास केशवराव जेधे चौकात जेथे मिळतो तेथून उत्तरेस छ.शिवाजी रस्त्याने मिर्झा गालीब रस्त्यास रामेश्वर चौकात मिळेपर्यंत.

 

The Karbhari - PMC Pune 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: