PMC Ward 23 – Ravivar Peth Nana Peth | प्रभाग क्रमांक – २३ – रविवार पेठ- नाना पेठ| प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 23 – Ravivar Peth Nana Peth | प्रभाग क्रमांक – २३ – रविवार पेठ- नाना पेठ| प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 05, 2025 7:23 PM

Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी | भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
Pune Water Cut Update | पालखी मुक्कामाच्या काळात पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द करा 
MLA Hemant Rasane | आमदार हेमंत रासने ‘इन ॲक्शन मोड’, कचरामुक्त कसब्यासाठी भल्या पहाटे मतदारसंघात पाहणी

PMC Ward 23 – Ravivar Peth Nana Peth | प्रभाग क्रमांक – २३ – रविवार पेठ- नाना पेठ| प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

 

Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – रविवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ अशा पेठ रविवार पेठ नाना पेठ या प्रभागात येतात. मध्यवर्ती शहरातील हा प्रभाग आहे. या प्रभागाची सविस्तर रचना आपण जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC)

 

प्रभाग क्रमांक – २३ – रविवार पेठ- नाना पेठ

लोकसंख्या एकूण – ७६९८४ – अ. जा. ९५१३ – अ.ज. – ३२७

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

 

व्याप्ती: रविवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, अगरवाल कॉलनी, राजेवाडी, तपकीर गल्ली परिसर, बोहरीआळी, दारूवाला पूल परिसर, गणेश पेठ, पालखी विठोबा मंदिर परिसर, ऑरनेला हायस्कूल, इस्लामपुरा परिसर, पत्र्याची चाळ (एसआरए) भवानी पेठ पोलीस लाईन, अतुर टेरेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज, क्वार्टर गेट परिसर, दुल्हा दुल्हन कब्रस्तान, भवानी माता मंदिर, लक्ष्मी बाजार, नवीन हिंद हायस्कूल, आगरवाल कॉलनी इ.

उत्तर: छ. शिवाजी रस्त्यास गणेश रस्ता लाल महालाजवळ जेथे मिळतो तेथून पूर्वेस गणेश रस्त्याने समर्थ पूल (दारुवाला पूल) पर्यंत, तेथून दक्षिणेस नागझरी नाल्याने महेश चौकात मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस कै. मोतीलाल बाबूलाल परदेशी पथाने लक्ष्मी रस्त्यास डुल्या मारुती चौकात मिळेपर्यंत तेथून पूर्वेस लक्ष्मी रस्त्याने अरुणा चौकात मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस विठ्ठलराव कांगले पथ ने पारशी अग्यारी चौकापर्यंत तेथून पूर्वेस रघुनाथ दिनाजी पवार रस्त्याने पंडीत जवाहरलाल नेहरु रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने कादरभाई चौकात स्वामी बोधराज रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्व: पंडीत जवाहरलाल नेहरु रस्ता कादरभाई चौकात स्वामी बोधराज रस्त्यास मिळतो, तेथून दक्षिणपूर्वेस स्वामी बोधराज रस्त्याने क्वार्टर गेट चौकात मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेकडे अतुर टेरेसच्या पूर्वेकडील रस्त्याने पदमजी रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने पुणे कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीपर्यत व पुढे सदर हद्दीने महात्मा फुले रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: पुणे कॅन्टोन्मेंटची मनपा हद्द महात्मा फुले रस्त्यास मिळते, तेथून पश्चिमेस महात्मा फुले रस्त्याने दत्तोबा कोंढरे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस दत्तोबा कोंढरे रस्त्याने लक्ष्मीनारायण अपार्टमेंटच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने शंकरशेट टेंबेकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने महात्मा फुले रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने महाराणा प्रताप रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस महाराणा प्रताप रस्त्याने गोविंद हलवाई चौकात मिर्झा गालिब रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने भूतकर हौद रस्त्यास मिळेपर्यंत.

पश्चिमः मिर्झा गालिब रस्ता भूतकर हौद रस्त्यास मिळतो, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने न. चिं. केळकर रस्त्यास पासोड्या विठोबा मंदिराजवळ मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने छ. शिवाजी रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस छ. शिवाजी रस्त्याने गणेश रस्त्यास लाल महालाजवळ मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: