PMC Ward 11 – Rambagh Colony Shivtirthnagar | प्रभाग क्रमांक ११ – रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर – प्रभागाची व्याप्ती आणि सविस्तर माहिती जाणून घ्या
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर हा महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील ११ व्या क्रमांकाचा प्रभाग. शिवतीर्थ नगर पासून ते बळवंतपूरम साम्राज्य पर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे. या प्रभागाची व्याप्ती, स्वरूप, हद्दी अशा सर्व गोष्टी जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)
प्रभाग क्रमांक ११ – रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर
लोकसंख्या एकूण – ७६२०४ – अ. जा. -५५६९ – अ ज – ५७४
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: शिवतिर्थ नगर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, हनुमान नगर, एल. आय. सी. कॉलनी, माधव बाग, गिरीजा सोसायटी, दत्त नगर- सुतारदरा, किष्किंदा नगर, ए. आर. ए. आय. एम. आय. टी. कॉलेज, मोरे विद्यालय, भारती विद्यापीठ एरंडवणा, बळवंतपूरम साम्राज्य इ.
उत्तर: मौजे कोथरुड व मौजे पाषाणची हद्द जुन्या मनपा हद्दीस जेथे मिळते तेथून पूर्वेस मौजे कोथरुड व मौजे पाषाण यामधील हद्दीने मौजे भांबुर्डा (शिवाजीनगर) व मौजे एरंडवणाच्या हद्दीस वेताळ मंदिराजवळ मिळेपर्यंत.
पुर्वः मौजे भांबुर्डा, मौजे एरंडवणा व मौजे कोथरुडची हद्द जेथे एकमेकांस मिळते त्या वेताळ मंदिरापासून दक्षिण-पूर्वेस मौजे भांबुर्डा (शिवाजीनगर) व मौजे एरंडवणा यामधील हद्दीने विधी महाविद्यालयाच्या उत्तर-पश्चिम कोप-यावरील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस विधी महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील हद्दीने व पुढे शांतीशिला सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीने अमर सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस अमर सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे हद्दीच्या सरळ रेषेने ARAI कडून येणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पौड रस्त्यास मिळेपर्यंत.
दक्षिण: ARAI कडून येणारा रस्ता पौड रस्त्यास जेथे मिळतो तेथून उत्तरेस व पुढे पश्चिमेस पौड रस्त्याने कै. मिलींद ढोले चौकात किनारा हॉटेल कडून बळवंतपूरम साम्राज्य सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत.
पश्चिमः पौड रस्ता कै. मिलींद ढोले चौकात किनारा हॉटेल कडून बळवंतपूरम साम्राज्य सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यास जेथे मिळतो, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने (रामचंद्र माने रस्त्याने ) कांचनबन सोसायटी आणि सहकार वृंद सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने जुन्या पुणे मनपा हद्दीस मिळेपर्यंत.

COMMENTS