PMC Ward 6 – Yerawada Gandhinagar | प्रभाग ६ येरवडा -गांधीनगर – उपरोधिकपणे या प्रभागाला डायनासोर ची उपमा देण्यात येत आहे | असा कुठला भाग व्यापला आहे या प्रभागाने जाणून घ्या सविस्तर
PMC Election – 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणूक वार्ड रचनेतील प्रभाग ६ हा येरवडा -गांधीनगर आहे. उपरोधिकपणे या प्रभागाला डायनासोर ची उपमा देण्यात येत आहे. कारण विभिन्न परिसरातील सोसायट्या या प्रभागात जोडण्यात आल्या आहेत. तर चला जाणून घेऊया या प्रभागाने शहरातील कुठला कुठला भाग व्यापला आहे. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)
प्रभाग ६ येरवडा -गांधीनगर
लोकसंख्या- एकूण – ७७६०६ | अ. जा. -२०९५८ |अ. ज. ८४९
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: येरवडा गांव काश्मिरी कॉलनी, नवी खडकी गावठाण शिला साळवे नगर, अशोक नगर, गुंजन सिनेमा, कामराज नगर बालाजी नगर, सुभाष नगर, यशवंत नगर, मदर तेरेसा नगर, भाट नगर, कुमार आंगण, कुमार पर्णकुटी, जय जवान नगर (पार्ट). गांधी नगर, व्हाईट हाउस सोसायटी, येरवडा हॉट मिक्स प्लान्ट, सर्व धर्म सोसायटी, डॉन बॉस्को हायस्कूल, GST भवन, बिझनेस बे कॉमप्लेस. मुथा टॉवर्स, क्रिएटीसिटी मॉल, गोल्फ क्लब, येरवडा जेल जाई जुई शासकिय वसाहत इ.
उत्तर: येरवडा हॉटमिक्स प्लांटच्या पश्चिमेकडील रस्ता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गोल्फ क्लबच्या हद्दीस जेथे मिळतो, तेथून उत्तर पूर्वेस गोल्फ क्लबच्या हद्दीने कोमर झोनच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस सदर रस्त्याने सम्राट अशोक रस्ता ओलांडून येरवडा प्रेस मधील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने येरवडा जेलच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने व पुढे पूर्वेस येरवडा जेलच्या उत्तरेकडील रस्त्याने नॅशनल गेम्स रस्त्यास मिळेपर्यंत.
पुर्वः येरवडा जेलच्या उत्तरेकडील रस्ता नॅशनल गेम्स रस्त्यास जेथे मिळतो. तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने शांतीरक्षक सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस शांतीरक्षक सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्याने क्रिएटीसिटी मॉलकडे येणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणपूर्वेस सदर रस्त्याने शांतीरक्षक सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने गेनबा मोझे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने कै. सुरेश भोकरे चौकात येरवडा हिंदू स्मशान भूमीमधील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने अमरेश्वर घाटाजवळ मुळा-मुठा नदीस मिळेपर्यंत.
दक्षिण: येरवडा हिंदू स्मशान भूमीमधील रस्ता अमरेश्वर घाटाजवळ मुळा-मुठा नदीस जेथे मिळतो तेथून पश्चिमेस मुळा-मुठा नदीने डेक्कन कॉलेज रस्त्यास बंडगार्डन पुलावर मिळेपर्यंत.
पश्चिमः मुळा-मुठा नदी डेक्कन कॉलेज रस्त्यास बंडगार्डन पुलावर जेथे मिळते तेथून उत्तरेस डेक्कन कॉलेज रस्त्याने भारतरत्न कै. राजीव गांधी हॉस्पिटलच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने व पुढे उत्तरेस मेथडिस्ट मराठी चर्चच्या पूर्वेकडील रस्त्याने तसेच पुढे उत्तरेस कुमार पर्णकुटीच्या पश्चिमेकडील रस्त्याने गुरुद्वाराच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. (हकीम अजमल खान उर्दू हायस्कूल आणि क्रांतिवीर लहूजी वस्ताद सांस्कृतिक भवन यांच्या उत्तरेकडील रस्ता ) तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने शहीद भगतसिंग चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने डेक्कन कॉलेजच्या पूर्वेकडील डी. पी. रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर डी. पी. रस्त्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गोल्फ क्लबच्या हद्दीस मिळेपर्यंत.

COMMENTS