PMC Election Ward Structure | आज सायंकाळी महापालिका प्रारूप प्रभाग रचना होणार जाहीर! | क्षेत्रीय कार्यालयात लावले जाणार नकाशे

Homeadministrative

PMC Election Ward Structure | आज सायंकाळी महापालिका प्रारूप प्रभाग रचना होणार जाहीर! | क्षेत्रीय कार्यालयात लावले जाणार नकाशे

Ganesh Kumar Mule Aug 22, 2025 11:28 AM

PMC Election Draft Voter List 2025 | ४१  प्रभागांत ३५  लाख ५१ हजार ४६९ मतदार | प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
Dipa Mudhol Munde IAS | दिपा मुधोळ मुंडे यांनी स्वीकारला बाल विवाह निर्मुलनासाठीचा प्रतिष्ठित ‘स्कॉच’ चा पुरस्कार
Pune Pustak Mahotsav | पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार | लहान मुले, युवक, पुणेकर असा सर्वांना पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

PMC Election Ward Structure | आज सायंकाळी महापालिका प्रारूप प्रभाग रचना होणार जाहीर! | क्षेत्रीय कार्यालयात लावले जाणार नकाशे

 

PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी सायंकाळी म्हणजे आज  प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. रचनेचे नकाशे महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच क्षेत्रीय कार्यालयात देखील नकाशे लावले जाणार आहेत. त्यानुसार ४ सप्टेंबर पर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation Election)

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुणे शहराच्या प्रभाग रचनेचे प्रारूप महापालिकेने नगर विकास विभागाला पाठविले आहे. हे प्रारूप निवडणूक आयोगामार्फत 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात जाहीर करण्यात आले आहे . राज्यातील बहुतांश महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या प्रारुप रचना प्रसिद्ध करून हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. तर महानगरपालिका निवडणुकांसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना जाहीर करून हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार आज सायंकाळी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. ही रचना तत्काळ महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाईल. तसेच त्या त्या प्रभागानुसार क्षेत्रीय कार्यालयात देखील याचे नकाशे प्रसिद्ध केले जातील. त्यानुसार ४ सप्टेंबर पर्यंत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्त यांच्याकडे हरकती आणि सूचना नागरिकांना नोंदवता येतील. त्यानंतर त्या हरकती आणि सूचना हे सहायक आयुक्त मुख्य निवडणूक कार्यालयाकडे पाठवतील. त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रक नुसार ४ सप्टेंबर पर्यंत नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जातील. ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत हरकती सूचनांवर सुनावणी घेतली जाईल. त्यासाठी शासनाच्या प्राधिकृत अधिकारी नेमका जाईल. त्यानंतर १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत या हरकती सूचनावरील शिफारशी लक्षात घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. शासनाचे प्राधिकृत अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या मार्फत अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे सादर करतील. त्यानंतर ६ ऑक्टोबर पर्यंत राज्य निवडणूक आयोग कडून अंतिम प्रभाग रचना अधिसूचने द्वारे प्रसिद्ध केली जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: