महानगरपालिकेतील अनावश्यक कामावर होणारी खर्च टाळावा
: माजी महापौर संघटनेची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनावश्यक कामावर भरमसाठ खर्च केला जात आहे, हा खर्च थांबवावा. अशा प्रकारची मागणी आज पुणे शहर माजी महापौर संघटनेतर्फे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सेक्रेटरी कमलताई व्यवहारे, बाळासाहेब शिवरकर, अंकुश काकडे, दत्तात्रेय धनकवडे, रजनी त्रीभूवन यावेळी उपस्थित होते. यावेळी काही कामानिमित्ताने भाजपचे सभागृहनेते गणेश बिडकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने या ठिकाणी काही कामानिमित्तआले. त्यांनी देखील माजी महापौरांची ही मागणी योग्य आहे त्यासंदर्भात जरूर दखल घ्यावी असे मत व्यक्त केले. शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांची नाव देत असताना त्याचे रंग, आकार एक सारखा असावा अशी देखील मागणी होती तिला देखील सर्वांनी पाठिंबा दिला. आयुक्तांनी ताबडतोब अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यासंदर्भातील कारवाईच्या सूचना दिल्या.
COMMENTS