Pune University Flyover | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण!

Homeadministrative

Pune University Flyover | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण!

Ganesh Kumar Mule Aug 19, 2025 4:35 PM

Inauguration of Sinhgadh Road Flyover| सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला!
CM Devendra Fadnavis on PMRDA | पुणे महानगर क्षेत्रातील मलनि:सारणाच्या 1209.08 कोटींच्या कामांना मान्यता | पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा’ तयार करावा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis Met BJP Corporators | आपली प्रतिमा हे राजकारणातील सर्वात मोठे धन | प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका  | मुख्यमंत्री फडणवीस यांची नवनिर्वाचित नगरसेवकांकडून अपेक्षा

Pune University Flyover | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण!

 

Pune Flyover – (The Karbhari News Service) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात येईल. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (Dr Yogesh Mhase IAS PMRDA)  यांनी दिली. (Pune News)

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित रु.२७७ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय (RBI) या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मी. पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध – शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांग‍ितले.

ऑगस्ट २०२२ पासून कामाला सुरुवात

या उड्डाणपुलाच्या आराखड्यास प्राधिकरण सभा, कार्यकारी समिती, पुणे महानगरपालिका व पुणे एकीकृत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ करण्यात आला होता. या कामासाठी शासनाने २६/०५/२०२० रोजीच्या पत्रान्वये मेट्रो सवलतकार कंपनी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दरम्यान स्वाक्षांकित करावयाच्या पूरक सवलत करारनामाच्या मसुद्यास मान्यता दिली होती. तत्पूर्वी, अस्तित्वातील दोन एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट २०२० मध्ये शासनाच्या मान्यतेने पाडण्यात आले होते. यानंतर संबंध‍ित उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. मुख्य विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ५५ मी. लांब स्टील गर्डर बसवण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्प

माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ या २३.२०३ किमी उन्नत मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर असून आजपर्यंत ८८. ५१ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानक क्र. १९ चे बांधकाम विद्यापीठ चौक येथे प्रगतीपथावर असून मेट्रो स्थानक व औंध, बाणेर आणि पाषाण या तिन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी मेट्रो जिना प्रस्तावित केला आहे.

वैशिष्ट्ये

✅ एकूण १.७ किमी लांबी
✅ औंध ते शिवाजीनगर १.३० किमी लांबी
✅ ३ लेन रोड
✅ ९.५ मीटर रुंदी
✅ दोन खांबामधील अंतर २८ मीटर
✅ प्रकल्पाची किंमत रु. २७७ कोटी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: