Pune Property Tax | मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन

Homeadministrative

Pune Property Tax | मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन

Ganesh Kumar Mule Aug 19, 2025 4:11 PM

Pune Property Tax Abhay Yojana | पुणे शहर आणि समाविष्ट गावातील मिळकतधारकांसाठी महत्वाची बातमी | मिळकत कर विभागाची विशेष अभय योजना!
PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे घनकचरा विभाग, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभाग तर किशोरी शिंदे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी
E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन

Pune Property Tax | मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन

 

Avinash Sakpal PMC – (The Karbhari News Service) – मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  समोर आला आहे. त्यामुळे आता मिळकत कर विभाग सतर्क झाला आहे. तसेच  याबाबत महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. (PMC Property tax Department)

हद्दीतील मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, काही मध्यस्थ / दलाल/परिचित/अपरिचित/व्यक्तीं मिळकतकर कमी करून देतो/ थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून रोख स्वरुपात पैसे घेत असल्याचे निदर्शनास येत आहे अशी कोणी व्यक्ती कर कमी करून देणे संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैशांची मागणी करत असल्यास अशा व्यक्तीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण – घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे.त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे सकपाळ यांनी म्हटले आहे.

नागरिकांनी आपला मिळकत कर पुणे मनपाची अधिकृत वेबसाईट propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर, मनपाचे नागरी सुविधा केंद्र (CFC), बँक ऑफ महाराष्ट्र, आय. सी. आय. सी. आय. बँक, कॉसमॉस बँक, जनता सहकारी बँक, पुणे येथेच रोख / धनादेश / डी.डी. ने भरावा व त्याची अधिकृत पावती घ्यावी. असे देखील अविनाश सकपाळ यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: