RSS | लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक करण्याची आवश्यकता काय ? भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यावे | कॉंग्रेस ची मागणी
PM Modi – (The Karbhari News Service) – ज्या आरएसएसचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नाही तसेच ज्या आरएसएसने तिरंग्याचा स्वीकार केला नाही या देशातील भारतीय राज्यघटनेला मान्य दिली नाही त्यांच्याबद्दल 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून कौतुक करण्याची आवश्यकता काय ? याचे उत्तर भारतीय जनता पार्टीने दिले पाहिजे. अशी मागणी कॉंग्रेस चे सचिन आडेकर यांनी केली आहे. (Sachin Adekar Congress)
आडेकर यांनी म्हटले कि, आर एस एस ने भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष हा संघ सांगेल तोच होईल तसेच वयाची 75 पूर्ण केलेले सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी निवृत्ती घ्यावी यासाठी लावलेला तगादा यामुळेच आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएस च कौतुक करण्याची संधी सोडली नाही.
केवळ सत्तेत टिकून राहण्यासाठी आरएसएसची मदत घेणे यासाठीच ही चापलुसी नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली आहे. सत्तेच्या गेल्या अकरा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरएसएस बाबत अशी भूमिका घेतली नव्हती परंतु मागील काही दिवसांमध्ये आरएसएसचे संघप्रमुख मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यलढा व काँग्रेस यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले व केंद्रातील सत्तेतल्या भारतीय जनता पार्टीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच आजचे लाल किल्ल्यावरचे भाषण तयार झाले असावे असे मला वाटते. असे आडेकर म्हणाले.
—–
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून आरएसएस व मोदी शहा यांच्यामध्ये चाललेला वाद संपूर्ण भारताला माहिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून आरएसएसचा गौरव करणे हे मजबुरीतून केलेलं कार्य आहे अन्यथा ज्या आरएसएसचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नाही तसेच ज्या आरएसएसने तिरंग्याचा स्वीकार केला नाही या देशातील भारतीय राज्यघटनेला मान्य दिली नाही त्यांच्याबद्दल 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून कौतुक करण्याची आवश्यकता काय ? याचे उत्तर भारतीय जनता पार्टीने दिले पाहिजे.
- सचिन आडेकर, मा.अध्यक्ष, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटी

COMMENTS