79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न

Homeadministrative

79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न

Ganesh Kumar Mule Aug 15, 2025 4:27 PM

Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 
PMC Central Store Department | स्वातंत्र्यदिनाला शाळकरी मुले खाऊपासून राहणार वंचित! | टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका!
RSS | लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक करण्याची आवश्यकता काय ?  भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यावे  | कॉंग्रेस ची मागणी 

79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ संपन्न झाला. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

तसेच सकाळी ८.१५ वाजता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.

या प्रसंगी घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सायकल रॅलीला फ्लॅग ऑफ करून सुरुवात करून दिली. या नंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अवयव दात्यांचे नातेवाईक श्री.गायकवाड कुटुंबीय , दिधीन कुटुंबीय यांचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) एम.जे.प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, तसेच विविध विभागांचे उपायुक्त, खातेप्रमुख, अधिकारी , कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0