Pune PMC News | वेतन बिल लेखनिक व पेन्शन लेखनिक यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन
| प्रशिक्षण प्रबोधिनी कडून नियोजन
PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सर्व विभागातील वेतन बिल लेखनिक व पेन्शन लेखनिक यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण प्रबोधिनी कडून याचे नियोजन करण्यात आले आहे. १९ ऑगस्ट ला सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेतील कामकाजाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असून प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणेकरिता व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान देणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यानुसार महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारी यांना पुढील नमूद केलेल्या टप्प्यांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अ) पायाभूत प्रशिक्षण ब) पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण क) उजळणी प्रशिक्षण ड) बदलीनंतरचे प्रशिक्षण इ) नवीन विषयाची तोंडओळख प्रशिक्षण अशाप्रकारची विविध प्रशिक्षणे देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेतील वेतन बील लेखनिक व पेन्शन लेखनिक यांचेकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण १९ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुने जी.बी. हॉल) येथे सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

COMMENTS