SI, DSI Transfer | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदावरील सेवकांच्या समुपदेशाने होणार बदल्या 

Homeadministrative

SI, DSI Transfer | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदावरील सेवकांच्या समुपदेशाने होणार बदल्या 

Ganesh Kumar Mule Jul 29, 2025 10:43 PM

Pink E Rickshaw Yojana | पिंक ई- रिक्षा योजना | पुणे महापालिकेला एवढ्या महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट!
Pune Drug News | अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश
PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | ३१ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी 

SI, DSI Transfer | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदावरील सेवकांच्या समुपदेशाने होणार बदल्या!

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नियतकालीन बदल्या करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदावरील सेवकांच्या बदल्या समुपदेशाने करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कार्यवाही ही  ३१ जुलै  रोजी जुना जी. बी. हॉल येथे  करण्यात येणार आहेत. यात ५३ आरोग्य निरीक्षक तर ६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आहेत. या बाबतचे उपयुक्त प्रसाद काटकर यांनी जारी केले आहेत. (Prasad Katkar PMC)

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक – दुपारी ४:०० वा.

आरोग्य निरीक्षक –  दुपारी ४:००वा.

नियतकालीन बदल्यासाठी पात्र असलेल्या  कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या दिवशी बदलीच्या कार्यवाहीसाठी उपस्थित रहावयाचे आहे. सदर दिवशी व वेळेस उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या खात्यामध्ये बदली देणे बाबतचे अधिकार अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचेकडे राहतील. असे आदेश उपायुक्त प्रसाद काटकर यांनी जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: