PMC Solid Waste Management | स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये पुणे महानगरपालिकेचा देशात ८ वा  व राज्यात २ क्रमांक

Homeadministrative

PMC Solid Waste Management | स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये पुणे महानगरपालिकेचा देशात ८ वा  व राज्यात २ क्रमांक

Ganesh Kumar Mule Jul 17, 2025 8:19 PM

PMC Pune Water Supply Department | होळकर जलशुद्धीकरण केंद्रापासून चिखलवाडी स्टेडीयम (बोपोडी) पर्यंत पुणे मनपा हद्दीबाहेर उच्चदाब जलवाहिनी टाकली जाणार
Commercial Properties | PMC Pune | समाविष्ट ११ गावातील व्यावसायिक मिळकतीना दीड पट टैक्स लावता येणार नाही | तीन पटच टैक्स आकाराला जाणार | महापालिका प्रशासनाचा अभिप्राय
PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का? 

PMC Solid Waste Management | स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये पुणे महानगरपालिकेचा देशात ८वा  व राज्यात २ क्रमांक

PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) स्वच्छता व पर्यावरणपूरक उपाययोजनांची राज्य व केंद्र सरकारमार्फत प्रशंसा झाली आहे. पुणे शह्राने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ (Swachha Survey 2024) देशामध्ये पुणे महानगरपालिकेचा ०८वा (> १० लक्ष लोकसंख्या वर्गवारी) व राज्यात ०२ क्रमांक आलेला आहे. पुण्याला water + व GFC 5 star Certification मिळाला आहे. २०२२ आणि २०२३ साली पुणे महापालिकेचा ९ व क्रमांक होता. अशी अहिती उपायुक्त संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांनी दिली. दरम्यान २०१९ साली ३७ वा तर २०२१ साली ५ वा क्रमांक होता. (PMC Solid Waste Management Department)

महापालिकेने १००% दारोदारी कचरा संकलन प्रणाली अंमलात आणली असून, सुमारे ८.५ लाख घरे व व्यावसायिक मिळकतींकडून दररोज नियमितपणे कचरा उचलण्यात येतो. याकामी ९०० वाहने कार्यरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ९८९ कचऱ्याचे वर्गीकरण मूळ स्रोतावर केले जाते.

PMC ने ओला व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया प्रकल्पांची स्थापना केली आहे. सध्या १६ ओला व १४ सुका कचरा प्रक्रिया केंद्रे कार्यरत असून, या केंद्रांमधून कंपोस्ट, बायोगॅस, बायो- CNG, RDF (Refuse Derived Fuel) इत्यादीया अश्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. PMC ने घरगुती व सोसायट्यांमध्ये Decentralised composting ला देखील प्रोत्साहन दिले आहे.विभागाकडून तीन शिफ्ट मध्येस्वीपिंग व कचरा उचलण्याचे काम चालू आहे जेणेकरून इतरत्र कचरा पडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या करीता, विभागाकडून घंटागाडी, भरारी पथक वाहन व सफाई सेवक यांची नेमणूक करून रात्रपाळीमध्ये काम सुरु आहे.

PMC ने ‘Reduce Reuse Recycle (RRR) या संकल्पनेनुसार, १७ कायमस्वरूपी RRR केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्रांमध्ये नागरिकांकडून साहित्य स्विकारले जाते व त्याचा पुनर्वापर केला जातो. शिवाय, PMC कडून स्वच्छता आणि कचऱ्याविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात, आणि विविध भागांत cleanliness drives यांचा समावेश आहे. शाळा-महाविद्यालयां मध्ये स्वच्छतेचे मह्त्त्व competitions, events मार्फत बिंबवले जाते. युवकांना स्वच्छतेत सहभागी करून घेण्यासाठी PMC महा स्वच्छता अभियान, social media campaigns, प्लास्टिक मुक्ती अभियानासारख्या विशे मोहिमां मध्येही सक्रिय सहभाग असतो. स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता हि सेवा, इंडियन स्वच्छता लीग, सफाई आपनाओ बिमारी भगाओ अश्या अनेक कार्यक्रमयाच्या प्रसारा साठी नागरिकांची कायम साथ मिळाली आहे. असे उपायुक्त कदम यांनी सांगितले.

 

——–

आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेले आदेश व मार्गदर्शन केल्यामुळेतसेच विविध वृत्तपत्राचे वार्ताहर ह्यांनी वेळोवेळी पुणे शहरात स्वच्छेते बाबत प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्वरित कार्यवाही करणे करिता सहकार्य मिळाले. सर्व परिमंडळ १- ५ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालय महापालिका सहायक आयुक्त, प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक घनकचरा व्यवस्थापन अभियंता विभाग, क्षेत्रीय कार्यालय अभियंता विभाग आरोग्य निरीक्षक, मुकादम व सर्व कर्मचारी, व इतर संस्था व विभाग यांचे मोलाचे योगदान आहे. अशा सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे पुण्याचा अधिक सुधारित क्रमांक यायलाहातभार मिळाला आहे.

  • संदिप कदम, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: