Chandrakant Patil on PMC Election | महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे | चंद्रकांतदादा पाटील

HomeBreaking News

Chandrakant Patil on PMC Election | महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे | चंद्रकांतदादा पाटील

Ganesh Kumar Mule May 29, 2025 6:57 PM

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु 
BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 
Murlidhar Mohol | पश्चिम महाराष्ट्रात महायुतीस ४५ जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Chandrakant Patil on PMC Election | महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे | चंद्रकांतदादा पाटील

 

PMC Election – (The Karbhari News Service) – विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation  Election)  कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज दिल्या. तसेच, मोर्चा आणि आघाडीची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही ना. पाटील यांनी यावेळी दिल्या. (BJP Pune)

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करुन; नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर विष्णू कृपा कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आ. हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्रबापू मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ना. पाटील यांनी भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवावा. जेणेकरून, आणीबाणीच्या प्रसंगातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: