Sambhaji Bhide | महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी – मराठा क्रांती मोर्चा ची मागणी 

HomeBreaking News

Sambhaji Bhide | महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी – मराठा क्रांती मोर्चा ची मागणी 

Ganesh Kumar Mule May 23, 2025 8:56 PM

Shivshrusti Ambegaon | आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण!
Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shivjayanti | राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे

Sambhaji Bhide | महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी – मराठा क्रांती मोर्चा ची मागणी

 

Maratha Kranti Morcha – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर चे समन्वयक सचिन आडेकर यांनी केली आहे. (Sachin Adekar Pune)

आडेकर  म्हणाले, मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास विरोध दर्शविला आहे व तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळ्याचे समर्थन केले आहे. मुळातच मनोहर भिडे हे महाराष्ट्राच्या झाडाला लागलेला नासका आंबा आहे. संपूर्ण जग सहा जून रोजी राज्याभिषेक साजरा करत असताना महाराष्ट्र शासनाने देखील सहा जून हे राज्याभिषेक सोहळ्यासाठी अधिकृत केलेले असताना विनाकारण शिवप्रेमी मध्ये संशय निर्माण करण्याचे काम मनोहर भिडे करत असतात.
स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेणारे मनोहर भिडे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीच्या वेळी मूग गिळून गप्प बसतात व अशा प्रसंगांच्या वेळी मुद्दामून एखादे पिल्लू सोडून शिवप्रेमी मध्ये दुपारी निर्माण करतात हे योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मनोर भिडे उर्फ संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. असे आडेकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शिवप्रेमी असून मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांच्यावर नक्की कारवाई करतील अशी आशा आहे. असा विश्वास आडेकर यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: