Naval Kishor Ram IAS | आता नवल किशोर राम असणार पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त!

Homeadministrative

Naval Kishor Ram IAS | आता नवल किशोर राम असणार पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त!

Ganesh Kumar Mule May 21, 2025 8:10 PM

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेला राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान!
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी टाळली शिवसेना नेत्यांची भेट! | महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मात्र घेतली बैठक
Pune Airport Runway | पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

Naval Kishor Ram IAS | आता नवल किशोर राम असणार पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त!

 

PMC Commissioner – (The Karbhari News Service) – केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, शासनाने नवल किशोर राम (Naval Kishor Ram IAS) यांची  नियुक्ती, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका (pune Municipal Corporation Commissioner)  या पदावर केली आहे. डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS)  हे  ३१. मे २०२५ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे रिक्त होत असलेल्या जागी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अपर  मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.  (Pune Municipal Corporation – PMC)

राम हे पूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी होते. ते पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. ३१ मे रोजी राम हे मध्यान्ह नंतर आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारतील.

नवल किशोर राम, भाप्रसे  यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही तातडीने करावी, असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

अ) वरीलप्रमाणे बदलीच्या पदावर रूजू झाल्यासंदर्भातील रूजू अहवाल Supremo प्रणालीवरही (ER Sheet मधील Posting कॉलम मध्ये) न चुकता Update करावा व तसे केल्याचे या विभागास कळवावे.
ब) बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरण करतांना / स्विकारतांना संबंधित अधिकारी यांनी साप्रविने दिनांक १७.११.२०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यानुसार कार्यभाराबाबत कार्यवाही करावी.
क) नवीन पदस्थापनेनंतर पूर्वीच्या पदावरील सर्वसंबंधित अधिका-यांचे गोपनीय अहवाल / कार्यमुल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत.
ड) नवीन पदस्थापनेत ई-ऑफिस व e-HRMS यांचा वापर वाढविण्याकडे विशेष लक्ष देणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: