Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

Homeadministrative

Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

Ganesh Kumar Mule May 20, 2025 6:57 PM

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे
PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती 

Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

 

BJP Pune – (The Karbhari News Servie) – पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या एका लटकत्या केबलचा तुटलेला भाग अचानक खाली पडल्याने एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली असून, तो थोडक्यात बचावला. अशा प्रकारच्या घटना केवळ दुर्लक्ष किंवा व्यवस्थेतील निष्काळजीपणाचं लक्षण नसून, नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या आहेत. या बाबत आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने पुणे महानगर पालिकेच्या विद्युत अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

 

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये केबल्स – विशेषतः इंटरनेट व केबल टीव्हीच्या अनधिकृत तारा – बिनधास्तपणे उभारण्यात आलेल्या असून, त्यांची देखभाल किंवा तपासणी केली जात नाही. पुणे शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते, चौक व गल्लीतील केबल्सचे तातडीने तांत्रिक ऑडिट करण्यात यावे

अनधिकृतपणे टाकलेल्या किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या केबल्सची यादी तयार करून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी.

संबंधित कंपन्यांना नोटीस देऊन जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यातील घटना टाळण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना निश्चित करावी.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने PMC तर्फे एक विशेष हेल्पलाईन क्रमांक वा पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे, जिथे नागरिक अशा धोकादायक केबल्सची माहिती देऊ शकतील. असे घाटे यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात माजी नगरसेविका मानसी देशपांडे, सुशील मेंगडे,विशाल पवार ,प्रतुल जागडे विजय गायकवाड यांचा समावेश होता