Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

Homeadministrative

Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

Ganesh Kumar Mule Apr 30, 2025 8:21 PM

PMC Health System | MP Supriya Sule | पुणे महापालिकेकडे क्षय रोगावर असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत 
Sports Camp | बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिराचे आयोजन
MLA Ravindra Dhangekar | कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी | आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात

Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

 

MHADA Pune – (The Karbhari News Service) –  उपमुख्य अधिकारी, गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तिसोबत सदनिकेचा विक्री करारनामा करु नये; अन्यथा संबंधित विकासक आणि व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे म्हाडाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (Pune News)

म्हाडातर्फे ऑक्टोबर २०२३ पुर्वीच्या सर्व सोडतींमधील १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी नोंदणी व वितरण प्रक्रियेकरिता https://bookmyhome.mhada.gov.in/ संकेतस्थळावर सुरु करण्यात आले आहे.

या योजनेच्या वितरणासाठी कोणत्याही एजन्सीची नेमणूक केलेली नाही व कोणत्याही व्यक्तीस मध्यस्थी म्हणून नियुक्त केलेले नाही, नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये.

सदनिका वितरणाची प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी,म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही, अशी माहिती उपमुख्य अधिकारी अतुल खोडे यांनी दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: